औरंगाबाद - भीमनगर मधील मुख्य रस्त्यालगत वाल्मीकी चौक ते विपश्यना बुद्ध विहार गल्लीतील जीर्ण झालेली ड्रेनेज लाईन बदलण्याची आवश्यकता होती.
त्यानुसार वॉर्डाच्या मा.नगरसेविका आशाताई निकाळजे यांनी वॉर्डातील विविध विकासकामांसाठी 1 कोटीचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला.
त्या मंजूर निधीअंतर्गत वाल्मिकी चौक ते विपश्यना बुद्ध विहार गल्लीतील ड्रेनेज लाईन बदलण्याच्या कामाचे उदघाटन जेष्ठ नागरिक काशीबाई सातदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.नगरसेविका आशाताई निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते विजय निकाळजे, प्रा.मनोहर लोंढे, विजय खोतकर, संदीप पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उदघाटनप्रसंगी जी.एन.खंडाळे, भाऊसाहेब बचके, आण्णासाहेब बोरगे, सुनिल जानराव, प्रवीण गायकवाड, दिपक कांबळे, ज्ञानेश्वर बचके, शिवा नाडे, आनंद गंगावणे आदि वॉर्डातील नागरिकांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी - विशाल पठारे
0 Comments