पालघर: प्रतीक्षा सुमित लहारे ही महिला गरोदर असुन पतंगशहा कुटीर रुग्णालय जव्हार येथे दाखल झाली होती व त्या महिलाला A+ रक्ताची तात्काळ गरज भासली असुन
जव्हार तालुक्यात अत्यंत तातडीच्या रक्ताच्या आवश्यकतेच्या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देत जव्हार शहरातील रहिवासी सहेबाज काजी यांनी रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
विक्रमगड येथील प्रतीक्षा लहारे सध्या पतंगशाह कुटीर रुग्णालय, जव्हार येथे उपचार घेत असून तिला A+ रक्तगटाच्या रक्ताची अर्जंट आवश्यकता होती.
या पार्श्वभूमिवर ओमकार दादा कुवरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तातडीचे रक्तदान आव्हान केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत सहेबाज काजी यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन रक्तदान केले.
त्यांच्या या मानवतावादी व जात-पात च्या पालिकडे जाऊंन या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
"रक्तदान हेच श्रेष्ठ दान - आपल्या एका वेळच्या रक्तदानामुळे कुणाचे तरी आयुष्य वाचू शकते," असा संदेश या प्रसंगातून पुन्हा अधोरेखित झाला आहे
प्रतिनिधी: रेहान शेख
0 Comments