मुंबई - पदोन्नती आरक्षणासाठी आज मुंबईच्या दादर पूर्व रेल्वे स्टेशन समोर भीम आर्मी मुंबई प्रदेशच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.
7 मे 2021 चा जी आर त्वरीत रद्द करावा.
मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांची विशेष सरळसेवा भरती सुरू करावी, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदोन्नती आरक्षण धोरण लागू करावे, पदोन्नती आरक्षण समितीच्या अध्यक्षपदी अजितदादा पवार यांच्या जागी मागासवर्गीय अभ्यासू मंत्री नियुक्त करावा तसेच 7 मे च्या शासन निर्णयाविरोधात लोकशाही मार्गाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणा-या भीम आर्मी आजाद समाज पार्टीच्या आंदोलकांवरील अजामीनपात्र दाखल गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली..
उपस्थिती सर्व भीम आर्मी पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचे आभार, अभिनंदन आंदोलन यशस्वी केल्या बद्दल.
मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश गरुड,अविनाश समींदर, सुशीलाताई कापूरे, जाहीद शेख, श्रावण राठोड, संदीप गायकवाड, सुरेश धाडी, वैभव उजगिरे, संदीप गायकवाड, प्रशांत वाघमारे, मनीषाताई उबाळे, क्रांतीताई खाडे, तृप्तीताई वाघमारे, जयश्रीताई कांबळे, पंचशीलाताई खराटे,मनीषाताई बनसोडे, सादीक सिद्दिकी, आम्रपाली देशमुख,अब्दुल आवेसी, आदील अंसारी, नौशाद सिद्दिकी, शमीम खान,सादीक खान, लईक शेख, नफीस अहमद, फहीम सय्यद,नफीस अहमद,मोहसिन खान, इम्रान शेख यांच्यासह भीम आर्मी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..
0 Comments