सोयगाव : बोरमाळ तांडा येथे अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली . कोरॊना या भयंकर महामारी चा विचार करून बोरमाळ तांडा येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने प्रतिमेचेपूजन करून साजरी करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये एल्गार सेना सोयगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेला संघर्ष, त्यांचा जीवन प्रवास व त्यांच्या कार्या विषयी राजेंद्र गोरे यांनी मार्गदर्शन केले.
कोरोना या महाभयंकर महामारी पासून आपला कसा बचाव करता येईल याचे सुद्धामार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित एल्गार सेना सोयगाव तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ सावळे, गजानन साबळे, साळुबा भोजने, रामेश्वर राठोड, पंडित राठोड, श्रीराम काटकर, आबासाहेब सावळे, मच्छिंद्र गोरे, संजय खिल्लारे, गणेश गोरे, अमोल दांगोडे, जनार्दन धोंडकर, महिला आघाडी पदाधिकारी वैशाली ताई साबळे, आदी उपस्थित होते.
0 Comments