राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
धनगर समाज संघर्ष समिती बोरी (बु) ने केले होते आयोजन
बोरी (बु) : मारेगाव तालुक्यातील बोरी (बु) येथील धनगर समाज संघर्ष समिती च्या वतीने रणरागिणी, महापराक्रमी, न्यायदेवता, शूर वीरांगना, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर या महान आदर्शवादी राज्यकर्त्या होत्या. त्या प्रजावत्सल होत्या. त्यांच्या लोककल्याणकारी कार्याची महती संपुर्ण जगात पसरली आहे. अशा या शूर मातेच्या जयंतीच्या औचित्यावर धनगर समाज संघर्ष समिती बोरी(बु) ने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वीपणे संपन्न केले.
मानवतेला स्थैर्य निर्माण करणाऱ कार्य आज समितीच्या वतीने बोरी या गावात संपन्न झाल. सकाळी राजमातेच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला धनगर समाज संघर्ष समिती बोरी चे अध्यक्ष श्री रामचंद्रजी करडे, पदाधिकारी, सदस्य, उपस्थित होते. तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर विचार मंच च्या पदाधिकारी सौ गंगाताई करडे व इतर सदस्या उपस्थीत होत्या.
राजमाता अहिल्यादेवी च्या प्रतिमेला माल्यार्पण सौ गंगाताई करडे व नवनिर्वाचित सरपंच श्री प्रवीण नांने यांनी केले. तसेच उपस्थित पाहुण्यांनी ही राजमातेला आदरांजली वाहिली.
शासनाचे कोरोणा विषयक सर्व नियम पाळून हा जयंतीचा व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. जयंतीच्या कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे पाहुण्यांच्या हस्ते उदघाटन करून शिबिराला सुरुवात झाली.
या शिबिरामध्ये एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. गावातील हा रक्तदानाचा पहिला कार्यक्रम ठरला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी धनगर समाज संघर्ष समिती बोरी (बु) चे पदाधिकारी, सदस्य, राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला विचार मंच च्या पदाधिकारी, सदस्या, तसेच गावचे लोकप्रिय सरपंच श्री प्रवीण नांने, उपसरपंच श्री प्रदीप साबरे व सर्व गावकरी यांचे सहकार्य लाभले..
0 Comments