नंदुरबार - दि. 24: खडकी परिसरातील अतितीव्र कुपोषित बांलकांवर स्थानिक स्तरावरच उपचार करण्यासाठी नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत बाल उपचार केंद्र सुरू करण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असे निर्देश नाशिक विभागीय राधाकृष्ण गमे यांनी दिले.
धडगाव तालुक्यातील खडकी येथे प्राथमिक केंद्र भेटीच्या वेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके , साथरोग अधिकारी डॉ. नारायण बावा, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, गट विकास अधिकारी सी. टी. गोसावी आदी उपस्थित होते.
श्री. गने म्हणाले, अंगणवाडी केंद्रात पौष्टीक आहार देवूनही अतितीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करुन कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने बाल उपचार केंद्र उपयुक्त ठरेल. तोरणमाळ येथील केंद्राय बालकासोबत पालक थांबण्यास तयार नसल्याने स्थानिक स्तरावर उपचार करणे सोयीचे ठरेल आणि बालकांच्या प्रकृतीचीही चांगली काळजी घेतली जाईल. तसेच आवश्यकतेनुसार उपचारात बदल करता येईल.
आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामात त्रृटी असल्याने त्रयस्थ यत्रणेमार्फत बांधकामाची चौकशी करण्यात यावी. बांधकामात आवश्यक दुरुस्ती करुन आरोग्य केंद्रातील कामकाज लवकर सुरू करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.
खडकी परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कालांतराने तोरणमाळ येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल होणार असल्याने परिसरातील खाजगी निवासातील अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत स्थलांतरीत करण्याबाबत अातापासून नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी दिल्या.
श्री. गमे यांनी आरोग्य केंद्र परिसरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाची माहिती घेतली. जनजागृतीसाठी शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी चांगले प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अधिकाधिक नागरीकापर्यत पोहोचून त्यांना लसीकरणाविषयी माहिती घावी असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर श्री. गमे यांनी झापी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीइस भेट दिली. तेथील सुविधेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. परमानंद रावळे हे दुर्गम भागात सेवा देत असल्याने त्यांचे कौतुकही केले. आरोग्य केंद्रातील सुविधेबाबत परिसरातील नागरिकांना माहिती घावी आणि यासुविधेचा उपयोग त्यांनी करावा यासाठी त्यांचे समुपदेशन करावे असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.
तोरणमाळ इंटरनॅशनल स्कुल इमारतीची पाहणी
विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी तोरणमाळ येथील नवनिर्मित इंटरनॅशनल स्कुल इमारतीची पाहणी केली आणि तेथील अनावश्यक सुविधांची माहिती घेतली. शाळेच्या परिसरात स्थानिक प्रजातीचे झाडे लावावीत आणि परिसरातील एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. शाळेच्या परिसरात श्री. गमे यांच्या हस्ते एनएसई फाऊंडेशन आणि सीवायडीए संस्थेतर्फे कुपोषित कमी करण्यासाठी देण्यात आलेल्या पोषण आहाराच्या 2 हजार किटचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
त्यानंतर श्री. गमे यांनी मानव मिशन अंतर्गत तोरणमाळ येथील यशवंत तलावात उभारण्यात आलेल्या पिंजऱ्यातील मत्स्य पालन प्रकल्पाची माहिती घेतली. त्यांना गटातील महिलांशी देखील संवाद साधला. जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी आणि जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) विजय शिंदे यांनी प्रकल्पाची माहिती दिली..
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे
0 Comments