शहादा - दि .23: पंचायत समिती कार्यालय शहादा येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या 'डेमो हाऊस'चे उद्घाटन नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड , मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी,गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत 'डेमो हाऊस' बांधावयाचे आहे.नंदुरबार जिल्ह्यांत हे पहिले 'डेमो हाऊस' उभारले आहे. हे घरकुल उभारण्यासाठी बांधकामासाठी 2 लाख आणि मंजुरी साठी 77 हजार इतका खर्च झाला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ग्रामीण रूग्णालय इमारतत बांधकामाची पाहणी
श्री.गमे यांनी शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात इमारत बांधकामाची पाहणी केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पुर्वतयारी त्यादृष्टीने विद्युत जोडणी आणि स्वच्छतागृहांची कामे तातडीने पूर्ण करावे.कामाचा दर्जा चांगला राहील याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना त्यांनी त्यावेळी संबंधितांना दिल्या.
यानंतर त्यांच्या हस्ते शहादा तहसील कार्यालय परिसरात मियावाकी पध्दतीने वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला..
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे
0 Comments