अमरावती : भाजप गरिबांची पीडितांची जाणीव नसलेला पक्ष ? असा आरोप मंगेश भटकर पाटील प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल यांनी केला :
आज महाराष्ट्रात आसमानी संकटांना तोंड देत आहे, कोकण पश्चिम महाराष्ट्र वगैरे संपुर्ण पुराच्या विळख्यात आहे पण विरोधी पक्ष जनतेच्या मदती पेक्षा सरकार ला दोष देत आहे, ठीक आहे ते त्यांचे काम आहे, पण प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे गरजेचे आहे काय?
भाजप नेते पूरग्रस्त भागात जाता चांगली गोष्ट आहे पण त्यातून जनतेला तुम्ही काय मदत करू शकता यावर बोला ना, पण नाही यांना तर सवय पडली आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची. असे वक्तव्य सरचिटणीस यांनी केले.!
नारायण राणे जातात व अधिकारी नाही म्हणून त्यांना दम देतात अरे तुम्ही जा जनतेचे प्रश्न ऐका कर्मचारी वर्ग त्यांचे काम करतच आहे त्यांना त्यांचे काम करू द्या
आपला इगो अश्या वेळी बाजूला ठेवावा, अशा वेळी विरोधी पक्षांनी सरकारला साथ देऊन जनतेच्या समक्षा सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
तर हे भाजप नेते मा मुख्यमंत्री आता स्वतः गाडी चालवत पूरग्रस्त भागात जातील काय असे मूर्खा सारखे प्रश्न विचारतात म्हणजे यावरून लक्षात येते की याना जनतेची किती फिकीर आहे.
तरी फडणवीस केंद्रात तुमचे सरकार आहे पूरग्रस्त भागा करीता किती जास्तीत जास्त मदत महाराष्ट्र करिता आणता येईल हे बघा पण तुम्हाला हे जमणार नाही.
राजकारण करू नका जनतेची परेशानी दूर करावी असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
0 Comments