नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मालेगाव महानगरपालिका अभ्यासिकेच्या विविध मागण्यांसाठी आज १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता मालेगाव महानगरपालिका अभ्यासिकेत आंदोलन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील दारूचे दुकाने सुरू करण्यात आले आहेत. अभ्यासिका, ग्रंथालय हे मात्र आजवर बंद आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने स्वप्नील लोणकर याने घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे.
येत्या काळात विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षा होणार आहेत. मात्र अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका खुल्या नाहीत. परंतु विद्यार्थ्यांकडून त्यांचे महिन्याचे शुल्क घेण्यात मनपा कुठेच कमी पडत नाही.
अशा आहेत मागण्या
१) अभ्यासिका सुरू करण्यात यावी.
२) अभ्यासिका २४×७ तास सुरू ठेवावी.
३) सुट्टीच्या दिवशी देखील अभ्यासिका सुरू राहावी.
४) पुस्तकांचे वितरण सुरू करावे.
५) विलंब शुक्लात कपात करण्यात यावी.
६) नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा.
७) पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात यावी.
८) विलंब शुल्काच्या नावाखाली जे विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतले ते विद्यार्थ्यांना परत करण्यात यावे.
९) विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच नाव अभ्यासिकेला देण्यात यावे.
यावेळी ‘विलंब शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये जमा केले गेले ते लवकरात लवकर परत करावे’ असे मत जिल्हा सहसंयोजक कामेश गायकवाड यांनी मांडले. त्यानंतर ‘विद्यार्थ्यांनी अभ्यास करून अधिकारी बनावे की या काळात आंदोलन करून सरकारच्या नजरेत गुन्हेगार बनावे’ असा प्रश्न अभाविप मालेगावचे संघटनमंत्री सचिन लांबूटे यांनी केला. सोबतच अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करावी अशी मागणी केली.
यावेळी जिल्हा वसतिगृह प्रमुख शिवदास सूर्यवंशी, मालेगाव शहर सहमंत्री स्वप्नील भालेराव, निमगाव शाखा अध्यक्ष गणेश हिरे, भागेश गायकवाड, योगिता पाटील, दर्शन वाघ व सामान्य विद्यार्थी उपस्थित होते.
नाशिक प्रतिनिधी : अनिकेत मशीदकर
1 Comments
Great Moments
ReplyDelete