नांदेड : जिल्हयातील देगलूर - बिलोली तालुक्यात मागील 4-5 दिवसात सतत झालेल्या अतिवृष्टि मुळे ग्रामीण भागातील शेतकरी बांधव संकटात सापडला आहे.
तसेच तालुक्यातील बडुर येथे संततधार पावसाने धुमाकुळ घातला असुन कौलारू घरांचे व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले.
यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बडुर येथील महिला सरपंच सौ. चेतना मोहन जाधव (चेतना गंगाराम दावलेकर) यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले.
तसेच गावातील घराघरात पाणी शिरल्याने उपजिविकेचे धान्य भिजुन नुकसान झाले.
शेतात पाणी आल्याने पिके खरडुन गेली अश्या दुहेरी संकटात सापडलेल्या बडुर येथील नागरीकांना घरात, अंगणात, रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी असल्याने गावात हिंडता फिरता मुश्किल झाले आहे.
त्याकरिता मुरूम टाकुन द्यावे किंवा तशी परवानगी तरी द्यावे व गावातील घरांचे आणि शेतांचे पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी आशयाची मागणी तहसीलदार यांना बडुर येथील महिला सरपंच सौ. चेतना मोहन जाधव (चेतना गंगाराम दावलेकर) यांनी निवेदनाद्वारे केली असुन या निवेदनावर जगन्नाथ गुजरवाड, आनंद जाधव यांच्या स्वाक्षरी आहे.
बिलोली प्रतिनिधी : गजानन आरसेवार
+91 94209 98839
0 Comments