यावेळी छावणीचे पोलिस निरीक्षक प्रवीण वाडीले यांना मागणीचे निवेदन दिले. आंदोलकांना पोलिसांनी अटक करून सोडून दिले.
आंदोलनाचे नेतृत्व छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी केले.
तुर्तास मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याला फक्त राज्य शासनाने प्रभावीपणे युक्तिवाद न केल्याने कारणीभूत ठरला आहे.
समाजाची बाजूच न्यायालयासमोर आली नाही. यातून शासनाची कुटील बाजू समोर येताना दिसून येत आहे.
आता मात्र मराठा समाज शांत बसणार नाही. मराठा आरक्षण, शेतकरी विमा संरक्षण, पिकांना हमीभाव या मागण्यांना मान्य झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही. छावच्या पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे.
मराठा आरक्षण धोरण विरोधात शासनावर टीका करण्यात आली. जवळे यांच्या उपस्थितीत आरक्षण मिळावे यासाठी शहरात फेरी काढण्यात आली. महापुरुषांना अभिवादन ही करण्यात आले. नंतर टेहरे-सोयगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष जीवन हिरे, कारभारी शेवाळे, केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण तनपुरे, तालुकाध्यक्ष किशोर गांगुर्डे, महेंद्र हिरे, दिनेश अहिरे, प्रशांत जाधव, किरण निकम, राजू पाटील, बापू पवार, बापू गांजे, राकेश देवरे, आशिष निकम व आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होऊन सहभागी झाले होते.
नाशिक प्रतिनिधी : अनिकेत मशीदकर
0 Comments