नंदुरबार : आंबेबारा धरणापासुन ते आष्टे येथील नंदुरबार नगर पालिका पाणि पुरवठा एच.डी.पी पाईप लाईन टाकणेस गावकर्यांचा तिर्व विरोध बाबत तक्रारी अर्ज.
विषयानुसार विनंती अर्ज सन 1974 ते सन 1975 पासुन आंबेबारा धरण बांधणेस सुरुवात झाली. त्यापुर्वी पासुन स्थानीक रहिवासी आष्टे यांनी धरण व्हावे यासाठी खुप प्रयत्न करण्यात आले त्या अनुसंगाने सन 1974 ते 1975 पासुन धरण बांधणेस सुरुवात झाली धरण बांधणेस जवळ जवळ अंदाजे पांच वर्षाचा कालावधी लागला.
आंबेबारा धरणातील जलसाठा हा स्थानिक शेतकरी यांना शेतीस उपयोगासाठी ( आष्टे ) पिंप्रीपाडा लघु पाटबंधारे कार्यालय नंदुरबार मार्फत करण्यात येत असे.
लघु पाटबंधारे कार्यालयातील कर्मचारी व्रुंद यांनी मौखीक सांगावयाचे कि नंदुरबार नगर पालिकेने पाणी आरक्षण केले आहे. त्यामुळे शेतकर्यांना शेती उपयोगासाठी पाणी आता मिळणार नाही. शिवशंकर पाणी पुरवठा आष्टे, आंबेबारा या संस्थेला विश्वासात घेतेले नाही लघु पाटबंधारे कार्यालय नंदुरबार यांनी आष्टे येथील स्थानिक शेतकरी यांना परस्पर विश्वासात न घेता नंदुरबार नगर पालिकेचा पाणी विकुन टाकावयाचे आणि आष्टे येथील शेतकरी यांना वंचीत ठेवावयाचे असे शासनाचे धोरण आहे.
लघु पाटबंधारे नंदुरबार कार्यालयाचा मार्फत नंदुरबार नगर पालिकेस पाटाद्वारे पाणी पुरवठा करण्यात स्थानिक रहिवास्याचा विरोध नाही पण एच.डी.पी. ( काळे पाईप लाईन ) टाकण्यास तिर्व विरोध राहिल.
पाटा द्वारे पाणी स्थानिक पशु पक्षी ( गुरे जानवरे ) व आदिवासी बांधव मार्च ते जुन 15 पर्यंत पिण्यासाठी पाणीचा वापर करतात शेतकरी शेतातील कामे झाल्यावर जनावरांना बैलांना व शेळ्या-मेठ्या यांना पाणि पाजतात व पाटाचे पाणी जमिनीत मुरुन विहिरीत पाणी ( जलसाठा ) वाढतो. शासनांचे धोरण आहे कि, “ पाणि मुरवा पाणी जिरवा” त्यासाठी नंदुरबार नगरपालिका यांना पाईप लाईन टाकणेस स्थानिक रहिवासी यांचा तिर्व विरोध राहिल.
शांततेचा भंग झाल्यास नंदुरबार नगर पालिका सर्वस्वी जबाबदार राहिल..
न्यूज 24 खबर
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे
0 Comments