नंदुरबार : जिल्हा. पं. प्राथमिक शाळा भवानीनगर (बामखेडा त. सा.) केद्र सारंगखेडा ता शहादा जिल्हा नंदुरबार येथे मा शिक्षण आमदार सो. कपील जी पाटील साहेब व मा सरपंच महोदय सौ साधना बेन सखाराम पाटील यांच्या उपस्थितीत व हस्ते पूजन सानेगुरुजी बालभवन वाचनालय उद्घाटन करण्यात आले
आज दिनांक 30/6/21 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती संघटनेचे शाखा नंदुरबार व धुळे या दोन जिल्ह्यांसाठी घेऊन बैठक zoom घेण्यात आली
याप्रसंगी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील पूज्य साने गुरुजी बालभवन वाचनालय ऑनलाइन ऑफलाइन उद्घाटनाची सुरुवात जिल्हा पंचायत शाळा भावी नगर बामखेडा त.सा. येथून करण्यात आली त्यामुळे माझ्या शाळेसाठी गौरव पद घटना आहे वाचनालयाच्या उद्घाटनासाठी भावी नगर बामखेडा त.सा. या गावासाठी प्रथम नागरिक सरपंच महोदया सौ साधना बिन सखाराम पाटील या उपस्थित राहून त्यांच्या शुभ हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले
याप्रसंगी शिक्षक आमदार कपिल पाटील शिक्षक भरती प्राथमिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. नवनाथ गेंड संघटनेचे महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरतीचे पदाधिकारी धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षक भरतीचे शिक्षक सभासद बंधू भगिनींनी यांनी टाळ्या वाजवून वाचनालयाचे उद्घाटन शुभेच्छा दिल्या .
सदर zoom बैठककीत ना कपिल पाटील राष्ट्रसेवा दलाचे कार्याध्यक्ष मा श्री अर्जुन कोकाटे, महासचिव श्री अतुल देशमुख, मा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष मा.श्री. नवनाथ गेंड, राज्य उपाध्यक्ष श्री. खोशे, राज्य सरचिटणीस मा.श्री.भरतजी शेलार, विभागीय अध्यक्ष मा.श्री.राजेद्र दिघे, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री. गुलाबी तडवी, धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी कंखर, धुळे नंदुरबार या जिल्ह्याची कार्य करणी व शिक्षक शिक्षिका उपस्थित राहून zoom बैठक घेण्यात आली.
मा. कपिल जी पाटील यांनी धुळे व नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांच्या व राज्यांच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केली त्यात खालील विषय घेण्यात आले.
1) जूनी पेन्शन योजना
2) वस्तीशाळा शिक्षकांची मागील जूनी सेवा जोडणे.
3)108 शिक्षकांचे शिक्षण सेवक पदस्थापना रद्द करून अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षण नियुक्ती व. डी. ऍड संधी देणे
4) लहान कुटुंब या विषयावर मार्गदर्शन केले संबंधित विषयावर मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करून सदर विषय पूर्णत्वास नेला जाईल असे सांगितले.
सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.गेंड, सरचिटणीस मा भरत शेलार यांनी शिक्षकांच्या समस्यावर योग्य ते मार्गदर्शन केले या zoom बैठकीचे उत्कृष्टपणे सूत्रसंचालन पंढरीनाथ धनगर यांनी केले शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून समारोप करण्यात आला.
श्री संजय जे.निकुंबे
शिक्षक भारती नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष
9422369196 .8668758722..
नंदुरबार प्रतिनिधी : राहुल आगळे
0 Comments