अमरावती : बोराळा चांदुर बाजार मार्गावर भिषण अपघाताची घटना आहे या अपघातात ऑटो आणि कार समोरासमोर धडक झाल्याने 2 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी ..
बोराळा मार्गावर बोराळा येथून 1 कीलो मीटर अंतरावर पूजदा येथून भाजी पाला विकून भरधाव ऑटो चालक येत असताना व जवळा येथून शेती पाहून बोराळा मार्गे अमरावती जात असताना स्वीफ्ट डिझार सोमोरासमोर धडक झाली.
या अपघातात उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले ही घटना 31 जुलै ला रात्री 8:30 वाजता घडली..
1] आयुष्य रवींद्र विधळे - वय 12 वर्ष रा जवळा हल्ली मु अमरावती 2] संजय नीलकंठ अबूलकर - वय 55 रा रा काटसुर ता चांदुर बाजार अशी अपघात झालेल्यांची नावे आहे...!!
तर जखमी नागरिकांमध्ये
रवींद्र विधळे शिक्षक जिल्हा परिषद शिराळा येथे शिक्षक होते वय 50, पत्नी मीनाक्षी विधळे वय 45, शेख आरिफ, शेख शबीर वय 40 रा चांदुर बाजार, राजेश माणिकराव गायकवाड वय 30, शेख आफिज शेख नाबिर वय 57 हे गंभीर जखमी आहे ...
अमरावती जिल्हा सामन्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे ऑटो चालक यांचे पाय तुटल्याने त्याला नागपूर येथे हलवण्यात आले आहे ...
पुढिल तपास पोलीस स्टेशन चांदुर बाजार येथील पोलीस ठाणेदार किंनगे आणि विरु अमृतकर करत आहे अशी माहिती आमचे पत्रकार अमर वानखडे यांनी न्यूज ब्यूरो यांना दिली..!!
0 Comments