नांदेड : देगलूर तालुक्यात दि.१८ मंगळवार रोजी शहरातील लेंडी नदीच्या किनाऱ्यावर होत असलेली बौद्ध समाज स्मशानभूमी ही स्मशानभूमी न दिसता पार्क व पर्यटनक्षेत्र दिसले पाहिजे.
यासाठी येथील वातावरण हे नयनरम्य व शांतीपूर्ण होण्यासाठी नगराध्यक्ष मोगलाजीअण्णा शिरसेटवार यांच्या संकल्पनेतून मुख्याधिकारी इरलोड, नगरसेवक सुशिलकुमार देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली,
देगलूर नगर परिषदेच्या वतीने याठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात येत आहेत, काही झाडे लावणे झाले असून काम पूर्ण झाल्यावर अजून मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली.
यावेळी गुत्तेदार देविदासजी वानखेडे, नगर परिषद कर्मचारी फरसे, अग्निशमनचे पशामवार, गफारभाई, अरुण आऊलवार, यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments