अमरावती : टोम्पे महाविद्यालय चांदूर बाजार वाढदिवसानिमित्य रासेयो तर्फे वृक्षारोपण
अभिनव उपक्रमा अंतर्गत ३२५ वृक्ष आणि विविध प्रजातीचे ५० रोपट्यांची वृक्षारोपण ...
स्थानिक गो. सी टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकांतर्गत वृक्षरोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियानास अंतर्गत संपूर्ण महिनाभर विविध वृक्षांची लागवड करण्याचे नियोजित असून त्यातील एक भाग म्हणून सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग प्रा. डॉ. मुरलीधर वाडेकर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात एमसीव्हीसी बिल्डिंगच्या समोर पाल्म वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत वृक्षरोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियानात सामाजिक कार्यकर्ती कु. क्षमता संतोषराव ठाकूर यांच्या ११ व्या वाढदिवसानिमित्य आणि महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रविकांत कोल्हे, श्री. मधुभाऊ विजयकर आणि श्री. दिलीप राठोड यांच्या वाढदिवसानिमित्य महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भास्करदादा टोम्पे, सचिव गो. सी. टोम्पे सार्वजनिक ट्रस्ट तर कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अतिथी श्री तपन कोल्हे, अमरावती ग्रामीण गुन्हा शाखा, श्री. प्रफ्फुल बोरगडे, गटविकास अधिकारी चांदूर बाजार श्री. सुनिल किनगे, पोलीस निरीक्षक, चांदूर बाजार पोलीस स्टेशन, क्षमताचे वडील श्री. संतोषराव ठाकूर, तसेच यवस्थापन सदस्य, प्रा. डॉ. विजय टोम्पे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके तसेच कार्यक्रम अधिकारी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. डॉ. मंगेश अडगोकर कार्यक्रम अधिकारी यांनी राष्ट्रीय सेवा योजनाचे वृक्षरोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियानास अंतर्गत केलेल्या विविध वृक्षारोपणाचे वृत्तांत सांगत वृक्षारोपणाचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला वाढदिवस असलेल्या सत्कारमूर्ती कु. क्षमता संतोषराव ठाकूर, महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रविकांत कोल्हे, श्री. मधुभाऊ विजयकर आणि श्री. दिलीप राठोड यांना मान्यवरांच्या हस्ते वृक्ष भेट देवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कु. क्षमता ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या लहान पणापासून केलेल्या विविध सामाजिक कार्याचा उपस्थितांना अनुभव कथन करत महाविद्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असे मत व्यक्त केले आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्य महाविद्यालयाने पाच हजार धनादेश देवून केलेल्या मदतीचे विशेष आभार व्यक्त केलेतयांनी. प्रा. डॉ. विजय टोम्पे यांनी या उपक्रमास सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केलेत..
तर श्री तपन कोल्हे आपले मनोगत व्यक्त करतांना वाढदिवसानिमित्य वृक्षारोपण करण्याच्या राष्ट्रीय सेवा योजनांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केलेत तसेच छोट्या क्षमताच्या कामाबद्दल अभिनंदन केलेत..
कार्यक्रमाच्या अध्यक्ष भाषणात श्री. भास्करदादा टोम्पे यांनी महाविद्यालय करत असेलेल्या वृक्षारोपणाची गरज आणि महत्व सांगत कोरोनोदरम्यान ऑक्सिजनच्या अभावी होणारे मृत्यू आणि हास्पिटलला होत असलेला कमी तुटवडा अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून प्रत्येकाने ऑक्सिजन उसर्जित करणारे एक तरी वृक्ष दर वर्षी लावावे असे आवाहन केलेत.
कार्यक्रमांती कु. क्षमता ठाकूर यांच्या हस्ते एकूण ११ वृक्ष तर श्री.तपन कोल्हे, श्री.विजय टोम्पे, श्री.भास्कारदादा टोम्पे, डॉ. संजय सेजव, प्रा. प्रशांत देवतळे, प्रा. डॉ. रविकांत कोल्हे.
श्री.मधुभाऊ विजयकर, श्री. दिलीप राठोड, श्री. संतोषराव ठाकूर यांच्या हस्ते एक एक आणि इतर वृक्ष महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि रासेयो विदयार्थ्यां तर्फे असे एकूण ३२५ वृक्ष आणि गार्डन करीता विविध प्रजातीचे ५० रोपटे याप्रमाणे ३७५ झाडाची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवींकांत कोल्हे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी यांनी केलेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, प्रा. डॉ. निधी दीक्षित, प्रा. डॉ. उमेश कनेरकर, प्रा. डॉ. प्रशांत सातपुते, प्रा. डॉ. आशुतोष राजगुरे, डॉ. प्रवीण परिमल, श्री. शरद नानोटे, रोशन सावरकर, प्रफ्फुल तायडे, शुभम मोहोड, तर हर्षल ओकटे, ऋतुजा ठाकरे, मृणाल गावळी, योगिता धरणे.
भाग्यश्री निमकर, पूर्वा सुने, साक्षी सुसरे, आदर्श इंगळे यश इंगळे, प्रीती जोगी, वैष्णवी आजनकर, सुमित ठाकरे, सिद्धेश जावरकर, श्रुती टिकले, प्रज्वल राजस, वैष्णवी भोरगाडे, शंतनू बागडे, कु. ऋतुजा इंगळे इ स्वयंसेवकांनी प्रयत्न केलेत..
0 Comments