नवनिर्मिती फाउंडेशन व गावाविकास समितीच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल
रमजान गोलंदाज यांनी मानले अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांचे आभार
संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे येथील कळंबटे वाडी या ठिकाणी डोंगराला भेगा गेले असून या ठिकाणी असणाऱ्या कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतर करण्यात आले होते.
तळेकांटे येथील समाज मंदिरामध्ये जवळपास पंधरा ते वीस कुटुंब स्थलांतर करून 55 लोक त्या समाज मंदिरात राहत होती.सहा दिवस उलटले तरीही प्रशासनाकडून कोणतीही मदत या लोकांना मिळाली नव्हती याची बातमी नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज आणि गाव विकास समितीचे उपजिल्हाध्यक्ष मुजम्मिल काजी यांना मिळाली त्यांनी त्वरित या भागाला भेट देऊन त्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याचा जाब प्रशासनाला विचारत रमजान गोलंदाज यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या कानावर हा विषय टाकला या भागाला संगमेश्वर तालुक्याचे तहसीलदार यांनी भेट दिली होती आणि या लोकांशी संवाद साधला होता मात्र या नंतर या लोकांना कोणतीही मदत मिळाली नाही.
मात्र नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी या विषयाला आवाज उठवतात प्रशासनावर ताशेरे ओढत प्रशासनाने त्वरित मदत करण्याची मागणी केली होती.
त्यावर ती अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी तहसीलदार आणि संबंधित लोकांना सूचना देऊन तात्काळ स्थलांतरित केलेल्या लोकांना दहा किलो तांदूळ,10 किलो गहू,पाच किलो दाळ,आणि पाच लिटर रॉकेल देण्याची व्यवस्था केली त्याचप्रमाणे इतरही जीवनावश्यक साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आले आहे.
नवनिर्मिती फाउंडेशन च्या मागणीची दखल घेतल्याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी संदेश शिंदे त्याचप्रमाणे देवरुख तहसीलदार सुहास थोरात व संबंधित प्रशासनाचे नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी आभार मानले आहे.
तळेकांटे गावा समोरील असणारे क्रेशर चालकांकडून या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांना नाहक त्रास होत असल्याची तक्रार सात ते आठ महिन्यापूर्वी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मात्र प्रशासनाकडून थातुरमातुर उत्तर देऊन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सुद्धा रमजान गोलंदाज यांनी केला आहे मात्र क्रेशर विरोधातील आवाज आता बुलंद होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तळेकांटे येथील ग्रामस्थ एकत्र येऊन विरोधात आता बंड पुकारणार आहेत.
क्रेशर वाल्यांकडून होत असणाऱ्या बोरवेल ब्लास्टिंगमुळे या ठिकाणी घराला तडे गेले असून काही घरांना धोका निर्माण झाला आहे त्यातच आता डोंगराला भेगा पडत असल्यामुळे ही घरच्या घरी ढिगाऱ्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे प्रशासनाने संबंधित क्रेशर चालकांवर कारवाई करून संबंधित क्रेशर बंद करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
0 Comments