काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी पहाटे 03:30वाजता निधन झाले.
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षासाठी हा खूप मोठा धक्का आहे, ज्येष्ठ गांधीवादी आणि काँग्रेस नेते म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले आहे.
माजी आमदार आलुरे गुरुजी यांनी 1980 ते 1985 या काळात तुळजापूर तालुक्याचे विधानसभेवर प्रतिनिधीत केले.
शिक्षण आणि सहकार क्षेत्रामध्ये आलुरे गुरुजी यांचे मोठे योगदान राहिले आहे.अणदूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक असून सचिव म्हणून कार्यरत आहेत. नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेचे ते कार्याध्यक्ष आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक, तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे माजी विश्वस्त, लातूर येथील सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन, सोलापूर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, लातूर येथील बसवेश्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ सदस्य अशा विविध संस्थांवर त्यांनी काम केले.
राजकारणातील प्रामाणिक चेहरा, चारित्र्यसंपन्न नेता, सुसंस्कृत राजकारणी, गांधीजींचे तत्व आत्मसात करून राजकारण करणारे राजकीय नेते, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अभ्यास असणारे गुरुजी यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलुरे गुरुजी यांच्या प्रती भावना व्यक्त होत आहेत.
आलुरे गुरुजी यांचा अंत्यविधी कार्यक्रम दुपारी 03:00 वाजता अंदुर येथे होणार आहे अशी माहिती त्यांच्या परिवाराने आमचे न्यूज 24 खबर पत्रकार श्री प्रदीप परताळे यांना दिली..
0 Comments