अमरावती : मेळघाट मध्ये ससोदा या गावांमध्ये घर कोसळून आदिवासी बांधव बे घर झाले होते हि माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री बापुसाहेब देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी मेळघाट येथील घटनास्थळावरून जाहिर मदत केली..!
अश्या वेळी मुंबई गाडगेबाबा आश्रमशाळा चे अध्यक्ष, नागरवाडी संस्था संस्थापक बापूसाहेब देशमुख यांनी आदिवासी भागात जाऊन तिथे हाताने जेवण बनून
कपडे, धान्य, ब्लँकेट, गादी इत्यादी सर्व साहित्य देऊन एक प्रकारची दिवाळी करून एक मदतीचा हात सोमर केला..
आदिवासी बांधव जिथे राहत तिथे लाईन नाही पाणी नाही कसे राहत असेल असे वाघ, अस्वल सर्व प्राणी येथे आहे असे अनेक प्रश्न बापूसाहेब यांना पडले..
या पुरामध्ये नुकसानात सर्व वाहून गेले तिथे 110 वय वर्ष असलेली आदिवासी आजी यांस आवश्यक साहित्य वाटपकरण्यात आले..
या वेळी प्रमुख उपस्थित मा प्रा डॉ अरविंद देशमुख, सुखदेवराव भुतडा (अकोला), इंजिनीयर कोलते, गजानन महाराज देशमुख गाडगेबाबा बालगृह दर्यापूर सागरभाऊ देशमुख, गोरक्षण दर्यापूर, प्रकाश महात्मे, गजानन जवंजाळ, किशोरभाऊ, गाडगेबाबा आश्रम शाळा नागरवाडी सर्व कर्मचारी उपस्थित होते.
गावामध्ये बापूसाहेब देशमुख यांची मदतनीस कामामुळे गावातील सर्व ग्रामस्थ यांनी बापूसाहेब देशमुख यांचे धन्यवाद केले.
तसेच पुरामुळे झालेले नुकसान हे बापूसाहेब देशमुख यांच्यासह इतर सामाजिक कार्य करणारे यांच्या मदतकार्य मुळे गावात दिवाळी सारखा सण साजरा होत आहे असे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे..
0 Comments