औरंगाबाद : भोगले ऑटो मोटिव्ह B-8 रेल्वे स्टेशन, MIDC औरंगाबाद येथील कायम स्वरूपी काम करीत असलेले कामगार श्री.सचिन गायकवाड यांना कंपनीने गेल्या 15 दिवसापासून कामावर घेत नाही.
तुम्हाला काहीच काम येत नाही म्हणून जाणीवपूर्वक त्रास देत होते कोरोना मुळे कामगारांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे.
त्यात त्यांचा रोजगार कंपनी ने हिरावून घेतला त्यांना मानसिक शारीरिक व आर्थिक त्रास दिला त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
श्री.सचिन गायकवाड ( कामगार पर्मनंट ) कंपनी वर गेले व परत त्यांनी कंपनी मालक यांना विनंती केली की साहेब मी खूप गरीब आहे माझ्याशी तुम्ही असे का वागत आहात असे विचारले.
परंतु त्यांनी त्या कामगाराकडे दुर्लक्ष केले व त्यांना हाकलून लावले .
त्यांनी स्थानिक पोलीस सातारा ठाणे आणि कामगार उपायुक्त कार्यालयात सुद्धा दाद माघितली पण कंपनी मालक नित्यानंद भोगले यांनी कारवाई होऊ दिली नाही..
कारण पोलीस व लेबर ऑफिसर यांच्याशी चांगली ओळख असल्याने कामगारांची कोणतीच तक्रार घेतली नाही.
कामगार सचिन गायकवाड हताश व निराश होऊन त्यांनी दि.8/8/21 रोजी सकाळी 10.00 ते 10.30. च्या दरम्यान कंपनी गेट समोर विष पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला.
सद्या त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहे याला कारणीभूत फक्त कंपनी व्यवस्थापन आहे कारण तुमच्या अश्या दूर व्यवहारामुळेच कामगार आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो आणि कामगारांना त्रास देऊन कामगार कायद्या विरोधात आहे.
आणि मनमानी व हुकूमशाही कारभार करीत आहे भोगले कंपनीने आज पर्यंत अश्या कित्तेक कामगारांवर अन्याय केला आहे त्यांना देशोधडीला लावले आहे.
श्री. सचिन गायकवाड ( कामगार ) यांची भारतीय कामगार युनियन अध्यक्षा मा वृषालीताई उल्हास म्हात्रे, श्री अनिल पवार (सरचिटणीस), श्री कृष्णा गंगावणे (सहचिटणीस) यांनी त्या कामगारांची भेट घेऊन तब्येतिची विचारपूस केली आणि पिडीत कामगारांना धीर दिला.
भारतीय कामगार युनियन नेहमी कामगारांच्या सोबत आहे आणि कायम राहणार कामगारांनावर अन्याय करणाऱ्या विरोधात आमची संघटना सक्षम आहे.
आमच्या कामगार सभासदांना कंपनीने बेकायदेशीर पणे काढलेल्या आमच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यास आमची संघटना मे भोगले ऑटो मोटिव्ह विरोधात कामगारांना न्याय मिळावा यासाठी झटत आहे.
शेवट पर्यंत संघटना कामगारांना सोबत आहे. कंपनीला कामगारांच्या माघण्या मान्यच कराव्या लागेल व त्यांना पूर्ववत कामावर घेण्यास कंपनीला भाग पाडू असे आश्वासन भारतीय कामगार युनियन अध्यक्षा वृषालीताई उल्हास म्हात्रे यांनी सर्व कामगारांना तसेच औरंगाबाद जिल्ह्य़ात असलेल्या सर्व कंपनी मालकांना केले.
न्यूज 24 खबर औरंगाबाद सातारा परिसर प्रतिनिधी श्री प्रदीप गंगावणे यांनी बातमीचा पूर्ण आढावा घेतला.
1 Comments
कामगारांवर अन्याय करणाऱ्या मालकावर संघटना कायदेशीर कारवाई करणार
ReplyDelete