खेड शहरातील डॉ.गणपत गांधी यांच्या सोनोग्राफी सेंटर मधील कर्मचारी महिला रुग्णांना अपमानास्पद वागणूक देत असून त्यांच्याशी हेटाळणी जनक शब्दांत संवाद साधला प्रकरणी या सोनोग्राफी सेंटरची चौकशी करून त्याच्या वर कायदेशीर कारवाई करावी.
असे निवेदन खेड तालुका महिला आघाडी तालुका अध्यक्ष रेश्मा तांबे यांच्या नेतृत्वाखाली खेड तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच उप विभागीय अधिकारी आणि दंडाधिकारी व खेड वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना देताना युवक अध्यक्ष विकास धुत्रे सरचिटणीस सुरेंद्र तांबे, जेष्ठ नेते मिलिंद तांबे, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते,
तसेच याबाबत मिळालेल्या माहिती नुसार डॉ. धारिया यांनी आपल्या एका महिला रुग्णाला सोनोग्राफी साठी संबंधित सेंटरला पाठवले होते.
सलग तीन दिवस त्यांनी फेऱ्या मारून सुद्धा सोनोग्राफी साठी तुमचा नंबर अजून आला नसल्याने सांगण्यात आले. त्यांनी विनंती करून सुद्धा येथील कर्मचारी महिलेने त्यांच्यासह अपमानास्पद वर्तन करत, आम्हाला तुमची गरज नसून डॉ धारिया यांना आम्ही सांगितले नव्हते त्याचे रुग्ण पाठवायला, अशा शब्दांत हेटाळणी केली.
यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी कोणती भूमिका घेतील या कडे खेड तालुका रिपब्लिकन पक्ष आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अन्यथा तीव्रतेने आंदोलन छेडण्याचा ईशारा मधील आघाडी अध्यक्ष आणि त्याचे सहकार्य यांनी दिला आहे..
0 Comments