खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

भारतीय जनता युवा मोर्चा व स्फुर्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धा सन्मान व वृक्ष लागवड

उस्मानाबाद : कळंब तालुक्यात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त ईटकुर ता कळंब येथे भारतीय जनता युवा मोर्चा व स्फुर्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धा सन्मान व वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला..
प्रास्ताविक पर भाषणात उपक्रमाविषयीची भुमिका विषद करताना मकरंद पाटील यांनी कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आभार मानत असताना सर्व जग घरात सुरक्षिततेसाठी बसलेले असताना आपण बाहेर पडला आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेर पडला आणि रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न केले याबाबत कौतुकही केले पाहिजे असे मत व्यक्त केले. 

शिवाजी गिड्डे यांनी बोलताना वृक्ष लागवड व संगोपन याविषयी अधिक माहिती दिली. 

सुत्रसंचलन शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. बालाजी आडसुळ यांनी केले. 
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील, समर्थ बुथ अभियान लोकसभा विस्तारक शिवाजी गिड्डे,

भाजपा सरचिटणीस संजय जाधवर, ईटकुरचे माजी उपसरपंच महादेव पावले, भाजपा उपाध्यक्ष शिवाजी आडसुळ, चिटणीस प्रदिप फरताडे, 
पत्रकार एल डी शिंदे, युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन गंभीरे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools