रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गची अवस्था बिकट असून याबाबत रमजान गोलंदाज आक्रमक होऊन राष्ट्रीय महामार्ग विरोधात लेखी पत्र देऊन खड्डे बुजवण्याची मागणी केली होती.
मात्र संबंधित विभागला खड्ड्याची जाणीव नसल्याचे दिसते. कोणतीही कारवाई केली गेली नसून ये रे माझ्या मांगल्या अशीच परिस्थिती सुरु असल्याने जो पर्यत खड्डे डांबराने भरण्यास सुरवात करत नाहीत तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्णय रमजान गोलंदाज यांनी घेतला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी येथे महामार्ग लगत उपोषनास सकाळी १० वाजल्यापासून सुरवात झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना जाणीव नसल्याचे दिसत असून खड्डे भरण्याचे काम कंपनीचे आहेत अशीच उत्तरे मिळतात आता माघार नसून खड्डे भरावेच लागतील एवढे संबंधित विभागाने लक्षात घेतले पाहिजे.
या उपोषणास सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष वहाब दळवी, अनुसूचित जाती जमातीचे कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, धनाजी भांगे, जमूरत अलजी, मुझमीला काझी, अमित खातू, तैमूर अलजी, शोएब भाटकर, मकरंद गांधी, दिलदार कापडी, दत्तात्रय खातू, सलाउद्दीन बोट, बंटी खातू आदीसह अनेक लोकांनी पाठिबा दिला आहे..
0 Comments