खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

तेर येथील 'ग्रामसेवा संघ' या सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

उस्मानाबाद : तेर येथील 'ग्रामसेवा संघ' या सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

दि.17/09/2021 रोजी आपल्या गावच्या 'हरित ईटकूर' चा प्रतिनिधी म्हणून अमर आडसूळ यांचा शाल, श्रीफळ व मानाचा फेट बांधून जाहिर सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देतांना अमर दादाने हरित ईटकूरच्या आजवरच्या वाटचालीचा संक्षिप्त इतिहास मोजक्याच शब्दांत व्यक्त करुन व भविष्याचा वेध आपल्या ओजस्वी भावनिक शैलीत मांडताच टाळ्यांचा गजरात हरित ईटकूरच्या कार्याला दाद देण्यात आली.
तेथे जमलेला निरनिराळया क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या अनेक प्रतिनिधीने हरित ईटकूरच्या कार्याची दखल आपल्या मनोगतात घेऊन कौतुकाची थाप दिली. 

या वेळी हरित ईटकूरसाठी तन, मन, धनाने आजवर योगदान देणाऱ्या सर्वच हरित सेनेचे यावेळी मला मनापासून कौतुक वाटले. 
गावातील सर्वांनी दाखवलेला विश्वास व योग्य नियोजन यामुळे हरित ईटकुरला हा पल्ला गाठनं सहज शक्य झालं. नेहमीचं प्रसिद्धी पासून चार हात दूर राहिलेल्या अमर आडसूळचा प्रातिनिधीक स्वरुपातील हा सत्कार हा तमाम हरित ईटकूरच्या तन, मन, धनाने झिजणाऱ्या शिलेदारांचा / ईटकूरकरांचा हा सन्मान होता. 

कार्यक्रमासाठी सचिन गंभिरे, दिनकर आडसूळ, प्रभाकर आडसूळ सहभागी झाले होते.
हरित ईटकूरने स्विकारलेला हा पहिलाचं जाहिर सन्मान असल्याने थोडं अवघडल्या सारखे वाटनं स्वाभाविक होते. 

पण कुठलही कौतुक असो / पाटीवर दिलेली कौतुकाची थाप असो ही सत्कार असो ही नेहमीचं आपल्या कार्याला बळ देत असतात. 

त्यातून कार्य करणाऱ्यांना मानसिक उर्जा मिळत असते. आणि आपलं काम एकदा समाजानं स्विकारलं ही मनुष्यबळ आणि द्रव्यबळ यांची कमतरता पडत नाही. 
फक्त मनापासून काम करण्याची जबरदस्त इच्छा शक्ती मात्र असावी लागते. हरित ईटकूरच्या कार्याला सदिच्छा; शब्द संकलन आणि सूत्रसंचालन तुकाराम शिंदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools