खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

संततधार पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

उस्मानाबाद : कळंब तालुक्यात संततधार पडत असलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली सोयाबीन चे ढिगारे भिजत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

काही शेतकऱ्यांनी ताडपत्री झाकून ठेवलेले आहेत परंतु जमिनीला खालूनओल असल्याने पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे,
पावसाळा सुरू झाल्यानंतर सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती त्यानंतर मधल्या काळात अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले होते;
मात्र पावसाने कमी दिवसात सरासरी पाऊस झाला आता पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे.
बुधवार पासून ईटकुर, मोहा, शिराडोन या परिसरात अचानक पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन हातचे जाण्याची शक्यता आहे ;

करोना महामारी च्या संकटातून संपूर्ण देश भीतीयुक्त वातावरणात जगत असताना कष्टकरी शेतकऱ्यांनी भीती न ठेवता देशाला धनधान्याने समृद्ध करण्याकरता रात्रीचा दिवस करीत राबराब राबत आहेत,

अशातच सोयाबीन घरी येण्याच्या स्थितीत असताना बुधवारी सकाळपासूनच ढगांनी मुक्काम ठोकला होता दुपार नंतर अचानक पावसाने जोरदार हजेरी, लावली पावसाने  सोयाबीन पिकाची नासाडी केली असून पाऊस एक सारखा सुरू असल्याने शेतात जिकडे-तिकडे पाणीच साचले, 

त्यात आता सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्या समोरील संकटाची मालिका सुरूच असल्याचे दिसून आले. 

सोयाबीनची काढणी सुरू असताना पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली त्यामुळे काही शेतकऱ्यांचे शेतात सोयाबीन काढून पडले आहेत तर काही शेतकऱ्याच्या शेतात पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली. 

परिसरातील सोयाबीन ज आणि कपाशी नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे मूग उडीद पीक यासारखे पाण्याने जळून गेली आहेत.

संततधार पावसाने ज्यांच्या शेतात पाणी साचून सोयाबीनचे नुकसान झाले आहे तसेच पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक हातून गेले आहे .

अशा शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत आपली तक्रार फार्म मित्र ॲप वर नोंदवावी शेतकरी तक्रार नोंदणी करतात कोणत्या प्रकारची अडचण आल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आव्हान  कृषी सहाय्यक यांनी केले आहे..

सोयाबीनचे दरात चढ-उतार गेल्या दोन दिवसातील सोयाबीनचे दर हे शेतकऱ्याला धडकी भरली,

त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करावी का साठवणूक यामध्ये शेतकऱ्यांची मनस्थिती होत आहेत.

चार दिवसापूर्वी सोयाबीनचे दर हे ८००० ते ८५०० रुपये प्रति क्विंटल होते परंतु आजचे दर ४५०० ते ५०० वर आल्या मुळे सोयाबिन विकावे का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
 
ईटकूर येथे संततधार पावसामुळे भारत रणदिवे यांचे घर पडून फार मोठे नुकसान झाले आहे तरी इटकुर गावचे तलाठी पालखे  यांनी पंचनामा करून पुढील कार्यकार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे..

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools