खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

नागरवाडी येथे राज्यमंत्री ना श्री बच्चूभाऊ कडू यांच्या शुभहस्ते भगवान शिवशंकराच्या मुर्तीची स्थापना

अमरावती : निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांचे अंतिम श्रध्दास्थान श्री क्षेत्र नागरवाडी येथे राज्यमंत्री ना.श्री.बच्चूभाऊ कडू यांच्या शुभहस्ते भगवान शिवशंकराच्या मुर्तीची स्थापना.
श्री संत गाडगे बाबांचे अंतिम श्रध्दास्थान तसेच शासन सन्मानित ( ब ) दर्जाप्राप्त तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र नागरवाडी, येथे श्रावणमास तसेच बैलपोळ्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यमंत्री ना.श्री.बच्चूभाऊ कडू यांचे शुभहस्ते भगवान शिव शंकराच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली.
तसेच या प्रसंगी श्री अनिलभाऊ देशमुख सुरळीकर, श्री अतुल भरतराव रेळे यांनी भगवान शंकराच्या मुर्तीकरीता देणगी स्वरुपात मदत केली. 

या बद्दल संस्थेतर्फे राज्यमंत्री ना.श्री बच्चुभाऊ कडू यांचा शुभहस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

तसेच श्री गाडगेबाबांनी आपल्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सेवकाकडून लिहलेल्या पत्रात, “जे जे होईल ते ते करा वसान नागरवाडीचे इंद्रभुवन करा” असा प्रमुख उल्लेख केलेला आहे.
श्री बाबांच्या या संदेशाप्रमाणे मा.संचालक श्री बापुसाहेब देशमुख  श्री बाबांच्या कल्पनेतील खऱ्या अर्थाने नागरवाडी इंद्रभुवन साकारत आहेत असे राज्यमंत्री श्री बच्चूभाऊ कडू यांनी या प्रसंगी म्हटले.

तसेच भाविक भक्तांनी सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य अशा आनंदमय नागरवाडी पर्यटन क्षेत्राचा आनंद घ्यावा असे आवाहन देखील केले. 
सोबतच गरीब मुलामुलींना – शिक्षण, श्री बाबांच्या संदेशाप्रमाणे मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील  गोरगरीब आदिवासी, वनवासी बांधवांची 500 विद्यार्थी दरवर्षी श्री गाडगे महाराज आश्रमशाळा नागरवाडी येथे मोफत शिक्षणाचा लाभ घेत आहेत. 
त्याचबरोबर संस्थेचे सेवाकार्य खऱ्या अर्थाने सुरु आहे तसेच या कार्यक्रमाला ह भ प श्री भरत महाराज रेळे, 

श्री. मंगेशभाऊ देशमुख, श्री बाळासाहेब देशमुख बेलमंडळीकर, श्री प्रकाशभाऊ महात्मे, 

श्री गजाननराव जवंजाळ, श्री हरिभाऊ मोगरकर, श्री सुनिलभाऊ मोहोड, श्री प्रफुलभाऊ नवघरे,
तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व श्री बाबांची सेवक मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

1 Comments

  1. The Best Slots | Casino Roll
    The casino-roll.com best slots at Casino Roll. If you love table games, 바카라 사이트 to play blackjack, you have 바카라 사이트 to dental implants bet twice for 1xbet 먹튀 the dealer to win. The dealer must

    ReplyDelete

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools