कळंब : इटकुर ता कळंब जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ईटकुर प्रशालेचे मुख्याध्यापक सी.जे शिंदे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्याध्यापक सी जे शिंदे यांनी मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी हे आपल्या देशाचे महापुरुष आपण त्यांची शिकवण अंगीकारली पाहिजे त्यांनी दाखवलेला अहिंसेचा मार्ग आपण आत्मसात केला पाहिजे अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
शांती व अहिंसेच्या मार्गाने सत्याचा आग्रह धरता येतो, कोट्यवधी नागरिकांच्या मनामनात क्रांतीची ज्वाला पेटवता येते आणि सामर्थ्यशाली राजवटींचाही पाडाव करता येतो, हे जगाला दाखवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी होऊ शकतात.
लालबहादूर शास्त्री अतिशय नम्र होते स्वातंत्र्यानंतर त्यांनी अनेक मंत्री पदे सांभाळली व ते देशाचे दुसरे पंतप्रधान झाले त्यांच्या समर्पित सेवे दरम्यान ते जन माणसात निष्ठा व क्षमतेसाठी लोकप्रिय झाली त्यांनी देशाला जय जवान जय किसान हे घोषवाक्य दिले त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली देशाला विकासाच्या मार्गावर नेले.
यावेळी प्रशालेचे श्रीयुत एस एस ठोंबरे, आर एस शिंदे, बी एस कोकाटे, एन एम काझी, एम एस सय्यद, एस पी मुंडे, व्ही बी अडसूळ, एस जी भारती हे सर्व शिक्षक मंडळी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एस शिरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन ए एम यादव यांनी केले.
0 Comments