प्रभाग क्रमांक 7 मधील सर्वे न 57 नगपरिषदेची आरक्षित जागे बाबत त्या जागेवर उद्यान करणे बाबत
महोदय; आपणास कळवण्यात येते की, भोकरदन शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील पुखराज नगर मधील सर्वे न.57 नगरपरिषदेची आरक्षित जागा असून त्या ठिकाणी परिसरातील नागरिक घरातील घाण कचरा टाकत असून त्या परिसरात कचऱ्या मुळे दुर्गंधी पसरत आहे व डुकरांचा सुळसुळाट होत आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही वारंवार नगरपरिषदेला तोंडी सांगून व निवेदन देऊन सुध्दा नगरपरिषद त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
व नगरपरिषदेचे कर्मचारी यांना सांगितले असता ते म्हणतात ती जागा आमची नाही, मग ही जागा कोणाची याचा नगर परिषदेने खुलासा करावा ?
व त्या परिसरातील नागरिकांना पायबंद करावे नसता त्या जागेवर लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे, मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल, अशा इशारा दोन्ही संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिला..
0 Comments