कळंब - हम भीम के है बंदे बाबासाहेब के है शिपाई या कवालीतुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक, राजकीय, आर्थिक संघर्ष जलसाकार संभाजी भगत यांनी आपल्या विद्रोही आणि पहाडी आवाजातून जनतेसमोर मांडला.
कळंब येथील मध्यवर्ती भीम जन्मोत्सव समिती आयोजित शाहीरी आणि व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प दि.१० एप्रिल २०२२ रोजी जलसाकार संभाजी भगत यांनी मार्गदर्शक मा.नगरसेवक सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्ते सतपाल बचुटे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे आदी महामानवांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जलशास सुरुवात करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक सतपाल बचुटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुमित रणदिवे, शिवाजी शिरसाट, राजाभाऊ गायकवाड, चरणसिंह गायकवाड, संपादक सुभाष घोडके, दिलीप कसबे, प्रमोद ताटे,माणिक गायकवाड, मुकेश गायकवाड, नामदेव गायकवाड, प्रदीप कांबळे, प्रकाश म्हस्के, सुरज गायकवाड, सागर पट्टेकर, निलेश गवळी हे होते .
महाडच्या तळ्याचं पाणी पेटलं ग बाई. त्या तळ्यात माझ्या भिमाची छबी दिसंल ग बाई माझी माय भिमाई ग बाई.! या अंगाई गीतातून चवदार तळ्याचा लढा सांगत असतानी भीम अनुयायांची झोप उडवली तर वैचारिक आणि प्रबोधनात्मक गीतांनी अंगावर शहारे आणुन झोपेचं सोंग घेतलेल्या भीमसैनिकांना आपल्या विद्रोही आणि पहाडी आवाजातून जागे करण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश घोडके यांनी केले तर आभार सुयोग गायकवाड यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित रणदिवे, प्रविण गायकवाड, अजय भावे, शुभम गायकवाड, गौतम सिरसट, सुशिल गायकवाड, रोहन बचुटे, इंजि.मयुर गायकवाड, मयुर सिरसट, ऋतिक पट्टेकर, अजय बचुटे, अजय कांबळे, धीरज गायकवाड, अमर कदम, धनंजय ताटे आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
0 Comments