रत्नागिरी - खेड संगलट : नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात गुहागर विधानसभा मतदार संघात विकास कामांना निधी मिळविण्यात बाजी मारली आहे .
रस्ते, पूल, पाणी योजना, साठवन तलाव , बांधकाम सह विविध विकासकामांसाठी कोट्यवधिंचा निधी मंजूर झाला आहे .
मच्छिमार समाजासाठी त्यांच्या राहत्या घराची जागा आता त्यांच्या नावे होणार आहे . हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यासाठी आपण पाठपुरावा केला अशी माहिती आ भास्करराव जाधव यांनी त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली .
अधिवेशन काळात विधानसभा सदस्यान मध्ये आ भास्कर जाधव यांनी सर्वाधीक निधी आणला असल्याचे बोलले जात आहे.
आ जाधव पुढे म्हणाले की साखरी आगार येथील जेटी संदर्भात आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो मात्र त्यामधून ठोस कार्यवाही होत नसल्यानेआपण आक्रमक झालो .
शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्र बैठक घेऊन आ भास्कर जाधव हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दिलेल्या आश्वासनानुसार बैठक घेऊन आठ कोटी निधीची तरतूद झाली.
जुलै अखेर पर्यंत मंजूर निधी खर्च करण्याच्या सूचनाही संबधीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सांगितले; या अर्थसंकल्पात गुहागर मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मिळाला आहे. रस्ते व पुलासाठी 28 कोटी 16 लाख, 25 -15 या योजनेसाठी 100 कोटी निधी, पतन विभागाकडून पालशेत, वेळणेश्वर व वेलदुर येथील विकास कामासाठी 10 कोटी 44 लाख मंजूर झाले आहेत तर कापरे येथील पाझर तलावसाठी14 कोटी 28 लाख संगलट कोंडे येतील दीर्घकाळ रखडलेल्या तलावसाठी 34 कोटी 86 लाख, ग्रांगई तलावासाठी 34 कोटी, वावेत 30 कोटी, तर मुसाड येथे 32 कोटी,खर्चाच्या निधीला मंजुरी मिळाली.
अडवली, कात्रोली, कोकरे कारूळ यांच्या सह दाकमोली येथील तलाव कामांना प्रशासकीय मजुरी मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले .
याच वेळी अनेक रस्त्याचे ग्रेडेशन झाले असून ते राज्य मार्ग झाले आहेत. जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून घराघरात पाणी मिळणार आहे, त्यासाठी खेड, गुहागर आणि चीपळून तालुक्यासाठी कोट्यवधी निधी मंजूर झाला आहे.
भविष्यात पर्यटन विषयक निधी खर्च करण्यासाठी नव्या योजना आखण्यात येतील गुहागर बायपास रोडसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे आराखड्यानुसार रस्ता होण्यासाठी आपण लवकरच ना गडकरी यांची भेट घेऊ असे सांगितले .
तसेच कोळके वाडी धरणातील पाणी 36 गावांना देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय झाला असून त्याचे तातडीने अंदाजपत्रक तयार करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत त्याचा पाठपुरावा करीत असल्याचे आ भास्करराव जाधव यांनी सांगितले.
0 Comments