कळंब - तालुक्यातील ईटकूर येथे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त येथील मुस्लीम बांधवांना ईफ्तार पार्टीचे दि .२९ एप्रिल रोजी देशभक्त चे संपादक लक्ष्मण शिंदे - पाटील यांच्या संकल्पनेतुन आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच सौ मोहराताई हनुमंत कसपटे, बालासाहेब दिनकरराव तांबडे, पोलीस हेकॉ बीट आंमलदार ईटकूर, जेष्ठ सामाजिक नेते अरुण वेदपाठक, भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदिपभैय्या फरताडे, भाजपा मा तालुका उपाध्यक्ष शिवाजी गंभीरे, महात्मागांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजाराम आडसुळ, उपाध्यक्ष भारत जाधव, मुंबई पोहेकॉ बाळासाहेब लोंढे, वाशी पोस्टेचे पोहेकॉ सुनिल रणदिवे, लोकमत पत्रकार बालाजी आडसुळ, ग्रापसदस्य हनुमंत कसपटे, विनोद चव्हाण, आण्णा काळे, माजी ग्राप सदस्य राहुल रणदिवे, रितेश लगाडे, पत्रकार अमोल रणदिवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवर व मुस्लीम बांधवांच्या वतीने पुष्पहार घालुन उदबत्ती, मेणबत्ती प्रज्वलित करून महामानवाला सर्वांनी अभिवादन केले .
३ मे रोजी संपन्न होणाऱ्या ईद निमित्ताने येथील मुस्लीम बांधवांनी महिन्याभरापासुन रोजा उपवास धरला असल्यामुळे त्यांना गुलाब गुच्छ देवून त्यांना पोष्टीक आहार व त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करून त्यांना यावेळी सर्वांनी शुभेच्छा दिल्या .
मुस्लीम बांधवांनी यावेळी बोलताना या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून कोणत्याही सामाजिक ,गावच्या हिताच्या कार्यासाठी सर्वांच्या पुढे मुस्लीम बांधव असतील अशा आपल्या भावना व्यक्त केल्या .
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देशभक्त चे संपादक लक्ष्मण तात्या शिंदे - पाटील यांनी केले तर प्रस्ताविक माजी ग्रापसदस्य आत्माराम रणदिवे यांनी केले.
शेवटी आभार प्रदर्शन लोकमतचे पत्रकार बालाजी बप्पा आडसुळ यांनी मानले .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती कमेटी महोत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर रणदिवे, उपाध्यक्ष गौतम शिंदे, कोषाध्यक्ष रोहीत रणदिवे, आदित्य रणदिवे, सचिव बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भिमसैनिकांनी यावेळी मोठे परिश्रम घेवून हा कार्यक्रम पार पाडला.
0 Comments