कळंब दि. 12 सप्टेंबर कळंब तालुक्यातील ईटकुर मंडळातील नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची आमदार कैलास पाटील यांच्याकडून पाहणी.
तालुक्यातील ईटकुर कोठाळवाडी येथील नुकसानग्रस्त क्षेत्राची आमदार कैलास पाटील यांनी पाणी केली व शेतकऱ्यांची संवाद साधून सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष बांधावरती जाऊन खरी परिस्थिती जाणून घेतली.
सोयाबीन पिकावर सुरतीपासूनच गोगलगाय येल्लो मोजॅक तांबेरा आणि खोडमाशी आशा कीड रोगामुळे सोयाबीन पिकावर दुष्परिणाम झाल्याने उत्पन्नात घट होणार आहे या कीड रोगामुळे हाता तोंडाशी आलेले पीक उध्वस्त होत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे आमदार पाटील यांनी आश्वासित केले.
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार श्री. थिटे, मा. सरपंच अभिमन्यू अडसूळ, मा. उपसभापती व विद्यमान ग्रा.पं. सदस्य लक्ष्मण अडसूळ, गणेश पोते, महादेव मुळे, भारत सांगळे, बालाजी अडसूळ, शिवसेना नेते बाळासाहेब गंभीरे, विजय गाडे, बालाजी अडसूळ, केशव कस्पटे, बालाजी फरताडे, तालुका कृषी अधिकारी श्री जाधव, कृषी सहायक मनोज गुंड, पवन सावंत, विजय माने आदीसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 Comments