खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

कुलस्वामिनी गणेश मंडळ व हरित ईटकुर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कळंब -  दि. ३ सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यातील ईटकुर येथे कुलस्वामिनी गणेश उत्सव मंडळ व हरित ईटकुर यांच्यावतीने महादेव मंदिर टोकणी येथे विविधप्रकारच्या २०० वृक्षांची लागवड करण्यात आली . 
कुलस्वामिनी गणेश मंडळ व हरित ईटकुर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून गणेश उत्सवाच्या काळात अनोखा उपक्रम वृक्ष लागवड करून एक आदर्श गावासमोर ठेवला. 
या वेळी कळंबचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री एम रमेश व पोलीस निरीक्षक यशवंत जाधव या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभले. 
यावेळी लोकमत तालुका प्रतिनिधी बालाजी अडसूळ व प. स. उपसभापती लक्ष्मण अडसूळ, मंडळाचे अध्यक्ष अक्षय वाघमारे, युवा नेते अनंत लगडे, आबासाहेब फरताडे, अभिषेक गुजर, 
सचिन गंभीरे, देशभक्त संपादक लक्ष्मण शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस पाटील सोमनाथ जगताप, विश्वजीत मोठे, 
श्याम पांढरे , आरबा सय्यद, किशोर पांढरे, गणेश गिरी, सुमित माने तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर गणेश मंडळाचे सर्व सभासद, हरित ईटकुर ची सर्व टीम व परिसरातील तरुण मित्र मंडळ ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती. 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools