कळंब - अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त व शिक्षक दिनाचे औचित्य साधून ईटकुर येथे नॉलेज विंग्स डिजिटल एज्युकेशन प्रा. लि. पुणे व राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था ईटकुर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे उद्घघाटक ठाणे शहर पोलीस उपनिरीक्षक सचिन कुचेकर तर अध्यक्षस्थानी शाहू नभाजी मोरे होते.
या कार्यक्रमास उपस्थित भाजपाचे कळंब तालुका सरचिटणीस प्रदीप फरताडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कस्पटे, देशभक्त संपादक लक्ष्मण शिंदे, शासन पुरस्कृत शाहीर रामलिंग जाधव,
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष भारत जाधव, आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे, भाई बाबुराव जाधव, माजी सरपंच चांदणी मोरे,
सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब मोरे श्रीकांत चव्हाण या मान्यवरच्या हस्ते खालील यशस्वी विद्यार्थी चौथी ते सातवी अ गट व आठवी ते दहावी ब गट यांना पारितोषिक व उत्तेजनार्थ बक्षीस वाटप करण्यात आले .
त्यामध्ये अ गट असावरी रणदिवे, प्रीती गाडे, वैष्णवी अडसूळ, सिद्धी अडसूळ तर ब गटामध्ये पृथ्वीराज अडसूळ, आकांक्षा गंभीरे, वैभव कस्पटे या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देण्यात आले.
या परीक्षेत तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व यामध्ये सात विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले.
या कार्यक्रमास सौजन्य भारत किसन मोरे अध्यक्ष अण्णाभाऊ साठे शिक्षण संस्था यांचे लाभले तर हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नॉलेजविंग्स डिजिटल एज्युकेशन चे उस्मानाबाद जिल्हा व्यवस्थापक संतोष मोरे, एज्युकेशनल कौन्सलर अनिता मोरे, अमोल रणदिवे, समाधान मोरे, रितेश लगाडे, श्रीकांत चव्हाण, भाऊसाहेब मोरे, देसाई आदींनी परिश्रम घेतले.
बक्षीस वितरण झाल्यानंतर शाहीर रामलिंग जाधव यांचा महापुरुषावर प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला ईटकुर नगरीतील बहुसंख्या नागरिकांनी आनंद घेतला.
0 Comments