कळंब - तालुक्यातील ईटकुर येथील घोगा वस्तीवर तळागाळातील सर्व नागरीकांना प्रशासन स्तरावरून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व त्यांना योजनांची माहिती जनजागृती व्हावी यासाठी सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा योजनेचा लाभ सर्व नागरीकांना व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील योजनांची माहिती देण्यासाठी पंचायत समिती कृषि विभाग कळंब, तहसिल कार्यालय पुरवठा विभाग कळंब चे अधिकारी, कर्मचारी यांची यावेळी उपस्थितीती होती .
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बीरसा मुंडा यांच्या प्रतिमा पुजनाने झाली .
यावेळी दैनिक देशभक्त चे संपादक लक्ष्मण शिंदे, भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदिप फरताडे, ग्राम पंचायत सदस्य हनुमंत कसपटे, विनोद चव्हाण, आण्णा काळे इंजि. अभिजीत गंभीरे यांची उपस्थिती होती.
" बीरसा मुंडा कृषि योजना " या बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी पंचायत समिती कृषि विभागाचे कृषि अधिकारी मंगेश चव्हाण, कृषि विस्तार अधिकारी मोहन बंडगर, श्रीनिवास शिंदे यांच्यासह तहसिल कार्यालय पुरवठा विभागाचे अंशकालीन कर्मचारी नरहरी लोहकरे हे उपस्थित होते .
आदिवासी भटका समाज बांधवांच्या वस्तीवर असा प्रथमच कार्यक्रम घेण्यात आला.
सुरु असलेल्या सेवा पंधरवाडा सप्ताहात बीरसा मुंडा कृषि स्वावलंबन योजने मधून अनुसुचित जाती जमाती साठी प्रशासन स्तरावरुन नविन सिंचन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळे अस्तरीकरण, इनवेल बोअरींग, पंप संच, विजजोडणी आकार,
ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, पी.व्ही.सी पाईप, परसबाग या योजनेसंदर्भात ऑनलाईन करावयाची कागदपत्र, प्रत्येक योजनांची लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणारी एकूण अनुदान रक्कम, याबाबत पंचायत समिती कृषि अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.
तर नव्या जिर्ण जुन्या,नावे सामाविष्ट , नावे कमी करणे अशा शिधापत्रिकांच्या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता , विविध लागणारे नमुना नंबर फॉर्म कशा पद्धतीने भरून द्यायचे याची माहिती तहसिल पूरवठा विभागाचे नरहरी लोहकरे यांनी दिली
शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या या विविध योजनांचा अनुसुचित जाती जमातीच्या बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेवून आपला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास साधण्याचे अवाहन देशभक्तचे संपादक लक्ष्मण शिंदे यांनी यावेळी उपस्थित महिला, पुरुष, तरुण बांधवांना केले.
समाज बांधवांनी शासनाकडुन आपणाला मिळणाऱ्या सोयी सुविधांसाठी पुढे यावे याबाबत ग्रामपंचायत स्तरावरील लागणाऱ्या कागपत्रांच्या पुर्ततेसाठी ग्रा.प .कडुन कोणतीही अडचण येणार नसल्याचा निर्वाळा भाजपाचे तालुका सरचिटणीस प्रदिप फरताडे यांनी सांगितले .
यावेळी ग्राप .सदस्य हनुमंत कसपटे, विनोद चव्हाण, आण्णा काळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी, दत्ता काळे, सुबराव काळे, मोहन शिंदे, सुभाष काळे, भागवत शिदे, मच्छिंद्र शिंदे, कल्याण काळे, बालाजी शिंदे, भास्कर शिंदे, दशरथ शिंदे, अनिल काळे, आबा शिंदे यांनी मोठे परिश्रम घेतले.
0 Comments