यावेळी भारतीय दलित पँथर महाराष्ट्र अध्यक्ष एड रमेशभाई खंडागळे यांच्या सह महिला आघाडी वतीने बुद्ध विहार येथे गौतम बुद्ध यांच्या मूर्ती समोर पुष्गुच्छ ठेऊन , डॉ . बाबासाहेब आंबेडकर : एक अनमोल रत्न यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्या नंतर आंबेडकरी गीतांचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा भगवान धांडे, प्रा विलास कटारे, आसाराम गायकवाड, अरविंद अवसरमोल, अशोक मगरे, उमेश खंडागळे, गायक प्रभाकर खिल्लारे, नितेश तांगडे, गणेश चव्हाण, कडुबा म्हस्के, भैया चावरिया, किरण आरके यांच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच यावेळी विशेष उपस्थिती ही महिला आघाडी यांची मोठ्या प्रमाणात होती. ज्यामध्ये भारतीय दलित पँथर महिला आघाडी शहर अध्यक्ष उषाताई खंडागळे, सपना आरके यांच्यासह इतर महिला भगिनी उपस्थित होत्या.
सर्व भारतीय दलित पँथर औरंगाबाद पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
- पँथर
0 Comments