आमच्या मागे मोठमोठ्या नेत्यांचे व तसेच मोठमोठ्या लोकांचे हात आहे त्यामुळे तुमच्यासारखे मागासवर्गीय आमच्या पुढे काही नाही अशा भाषेत अर्वाच्य शिवीगाळ केली.
भारतीय दलित पॅंथर यांच्या वतीने एडवोकेट रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वात पैठण येथील पोलीस उपविभागीय अधिकारी यांना या विषयाची निवेदन दिले व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच त्यांना फाशी व्हावी याविषयी पोलीस अधिकारी यांच्याशी रमेशभाई खंडागळे यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.
यावेळी पोलीस अधिकारी यांना भारतीय दलित पॅंथरच्या वतीने हा विषय गंभीर असून याप्रकरणी लवकरात लवकर कठोर कारवाई करावी नसता भारतीय दलित पॅंथर च्या वतीने राज्यभर तीव्रतेने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी एडवोकेट रमेशभाई खंडागळे यांच्या वतीने देण्यात आला.
यावेळी निवेदनावर एडवोकेट रमेशभाई खंडागळे यांच्यासहित प्राचार्य समाधान धांडे, दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष नितेशभाऊ तांगडे, रामदास मगरे, संजय साबळे, बी के जाधव, सुरेश खाडवे, राष्ट्रपाल तुपे, गणेश चव्हाण, आरके, भारतीय दलित पँथर महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष शोभाताई पद्मने, शहराध्यक्ष उषाताई खंडाळे, सपना आरके इत्यादींची सह्या व उपस्थिती होती..
न्यूज 24 खबर
- किरण आरके
0 Comments