भोकरदन : तालुक्यातील सोयगाव देवी येथील दुर्गामाता माध्यमिक व उच माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत वर्ग ८ वी मध्ये शिकत असलेल्या तसेच शाळेपासून ०५ कि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त दूर अंतरावरून शाळेत येणे जाणे करणाऱ्या 39 मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत मोफत सायकल देण्यात आल्या.
त्यामुळे पायपीट करून शाळेत येणाऱ्या मुलींना सायकलच्या सहाय्याने शाळेत येणे सुलभ झाले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी सभापती श्री. एल. के.दळवी साहेब, मा.सरपंच सौ कासाबाई दळवी, प्राचार्य देविदास बोर्डे यांच्या हस्ते मोफत सायकल वाटप करण्यात आल्या.
यावेळी शाळेचे कर्मचारी गणेश थोरात, दिनकर सुरडकर, नितीन राठोड, अनिल कोरडे, कैलास दळवी, गजानन इंगळे, गणेश सुरासे, संदीप जाधव, हरिदास कळम, गजानन राऊत, श्रीमती सुजाता तायडे, लक्ष्मी मगरे, स्मिता मिरकर, संतोष सहाणे, करण दांडगे, योगेश गिरी, गणेश सुरडकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
0 Comments