खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

येणाऱ्या पाच वर्षात प्रत्येकाच्या घरात आणि शेतात पाणी असेल;कामगारांसाठी संच वितरण कार्यक्रमात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

येणाऱ्या पाच वर्षात प्रत्येकाच्या घरात आणि शेतात पाणी असेल;

कामगारांसाठी संच वितरण कार्यक्रमात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

नंदुरबार, दिनांक ३० ऑगस्ट २०२४ (जिमाका वृत्त)
तापी योजनेच्या माध्यामातून तालुक्यातील शेती आणि घराघरात येत्या पात वर्षात पाणी पोहचवले जाईल, याची ग्वाही आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे. 
ते आज नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथे आयोजित कामगारांसाठी साहित्य वितरण व विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, सरपंच प्रविण पाटील, उपसरपंच डॉ. मनोज राजपूत,मोतीलाल पाटील, दिलीप पाटील, सोपान भलकार, डॉ. रणजित राजपूत यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. 
यावेळी बोलताना मंत्री डॉ. म्हणाले, तालुक्यातील आसाणे आणि निंबेळ या ठिकाणी धरणांच्या उभारणीसाठीची निविदा येत्या १५ दिवसात प्रसिद्ध होणार असून त्यामुळे तापी नदिचे पाणी या धरणांमधून नंदुरबार शहरासह तालुक्याच्या शेती आणि पेयजलाची गरज भागविणार आहे. 
तालुक्यातील प्रत्येक गावात पेव्हर ब्लॉकसह, रस्ते, गटारी यासारखी विकासकामे देण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही मागणीप्रमाणे ही कामे करण्यात येतील. कामगारांच्या विकासासाठी शासन सदैव तत्पर असून त्यांच्या दैनंदिन उपयोगच्या साहित्यासह त्यांना सामाजिक, वैदयकीय, शैक्षणिक, आर्थिक सक्षमतेसाठी जे-जे शासन म्हणून कराता येईल ते केले जात आहे. 

येणाऱ्य काळात जिल्ह्यातील एकही कामगार शासनाच्या सुविधांपासून वंचित राहणार नाही, यांचे नियोजन करण्याचा प्रयत्न असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले. 
कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात खर्दे, सैताने, ढंढाणे, रनाळे वैंदाणे, बलवंड येथील ६०० कामगारांना दैनंदिन उपयोगाच्या संचांचे वितरण मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - राहुल आगळे 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools