साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती भीमनगर, भावसिंगपुरा परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
परिसरातील अण्णा भाऊ साठे चौक या ठिकाणी सकाळच्या सत्रात अण्णा भाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन एकता मित्र मंडळ साठे चौक व अध्यक्ष अण्णासाहेब बोरगे यांनी केले होते.
यावेळी मा.नगरसेवक मिलिंद दाभाडे शिवसेना (ठाकरे गट) पश्चिम उपशहरप्रमुख गणेश लोखंडे, राम गाडे, किशोर उकिर्डे करमाड, प्रहार पक्षाचे कुणाल राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) रमेश हिवराळे, महेश तांबे, आसेगाव सरपंच प्रभू बागुल व विनोद साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी थोडक्या शब्दात अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
त्यानंतर सायंकाळी सजवलेल्या भव्य रथातून अण्णा भाऊ साठे यांची प्रतिमेची मिरवणूक साठे चौक ते भीमनगर सांची प्रवेशद्वारा पर्यंत काढण्यात आली.
यावेळी लहानगे,महिला व पुरुष डीजेच्या संगितावर ताल धरत सहभागी झाले.
सायंकाळी निघालेल्या मिरवणूक रथातील अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय निकाळजे, वंचित पश्चिम शहराध्यक्ष संदीप शिरसाठ, काँगेस शहर जिल्हाउपाध्यक्ष सुनील डोणगावकर, अखिल भारतीय सेना सतीश म्हस्के, डॉ.अविनाश सोनवणे, शिवसेना (ठाकरे गट) अमित घनघाव, विविध पक्ष, संघटना व संस्था पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या जयंती सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यासाठी एकता मित्रमंडळाचे विकी जाधव, मुकुंद चव्हाण, संतोष नाडे, एकनाथ नाडे, अरुण जाधव, राजू शेगावकर, योगेश हिवराळे व सागर जाधव यांनी परिश्रम केले..
0 Comments