छत्रपति संभाजीनगर: गर्व नाही पण घरचे संस्कार आहे
धमकी नाही पण धमक आहे, पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे, म्हणून तर गर्वाने म्हणतो मी आदिवासी आहे.
या टॅग लाईननुसार जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज व अनिरुध्द क्रिडा मंडळ छावणी छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी मा.डॉ.वेंकट कांथिराम राठोड (SDM) साहेबांना आदिवासी समाजाचे जनक क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा देऊन जागतीक आदिवासी दिना निमित्त गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र मन्नेवारेल्लू समाजाचे कार्यकर्त व अनिरुध्द क्रिडा मंडळ अध्यक्ष विजय चौधरी,ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकिशोर साकल,विक्रांत आवळे,व नितिन चौधरी यांची उपस्थिती होती.
0 Comments