खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

आयएएस अधिकार्यांना धर्मावर आधारीत व्हॉट् अॅप ग्रुप बनवनं भोवलं, सरकारने केले निलंबित

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
आयएएस अधिकारी गोपालकृष्णन आणि एन. प्रशांत यांना दोन व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करने चांगलचं अंगलट आलं आहे. याप्रकरणी केरळ सरकारने 11 नोव्हेंबर रोजी त्यांना निलंबित केले. त्यांच्यावर सेवा नियमांचे पालन न केल्याचा आणि शिस्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

आयएएस अधिकारी गोपालकृष्णन यांनी मल्लू हिंदू अधिकारी नावाचा व्हॉटस अॅप गु्रप बनवला. या गु्रपचे ते अॅडमीन होते. ग्रुपमध्ये मल्लू हिंदू अधिकारी होते. दुसरे आयएएस अधिकारी आणि एन. प्रशांत यांनी मल्लू मुस्लिम अधिकारी गु्रप बनवला. या मुस्लीम अधिकारी होते. ते या ग्रुपमध्ये 30 ऑक्टोबर रोजी जोडले गेले. दोन्ही ग्रुपमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी जोडले गेले. या ग्रुपमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांनीच गोपालकृष्णन यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
यांनतर केरळ सरकारने सोमवारी गोपालकृष्णन यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्यावर शिस्तीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला. गोपालकृष्णन यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आणखी एका प्रकरणात आणखी एका आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरे अधिकारी प्रशांत यांना एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर सोशल मीडियावर टीका केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. मुख्य सचिवांकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

आयएएस अधिकारी गोपालकृष्णन हे उद्योग आणि वाणिज्य विभागाचे संचालक होते, तर प्रशांत यांनी कृषी विकास आणि शेतकरी कल्याण विभागाच्या विशेष सचिवाची जबाबदारी सांभाळली होती. तिरुअनंतपुरम शहर पोलिसांनी गोपालकृष्णन यांच्याविरोधात तपास केला होता आणि त्याचा अहवाल डीजीपी यांना सादर केला होता.

गोपालकृष्णन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यात म्हटले होते की त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला असून त्यातून धर्मावर आधारित व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. आयएएस अधिकाऱ्याचा फोन हॅक झाला नव्हता, तिरुअनंतपुरम शहर पोलिस आयुक्त स्पर्जन कुमार म्हणाले की, डिव्हाइसमध्ये छेडछाड झाली की नाही हे स्पष्ट नाही कारण ते रीसेट केले होते.

आयएएस गोपालकृष्णन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या नंबरवरून मल्लू हिंदू ऑफिसर्स आणि मल्लू मुस्लिम ऑफिसर्स नावाचे दोन व्हॉट् अॅप ग्रुप तयार करण्यात आले होते. अनेक आयएएस अधिकाऱ्यांचाही या ग्रुपमध्ये समावेश होता, त्यानंतर गदारोळ झाला होता. अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ गट तयार केले जातात, परंतु उच्च अधिकारी अशा प्रकारे धार्मिक गट तयार करू शकत नाहीत, हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असे सांगण्यात आले. तथापि, अनागोंदी वाढल्याने, त्याच्या स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी गट विसर्जित झाला. त्यानंतरही हे प्रकरण थांबून राहिलेलं नाही.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools