छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका)- ११०-पैठण विधानसभा मतदार संघाच्या अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती महिला सुसंवाद कार्यशाळा संतपीठ प्रशासकीय इमारत येथे शुक्रवारी (दि.१५) .पार पडली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सारंग चव्हाण, रतनसिंग साळोक तसेच अजिंठा फार्मा कंपनीचे व्हॉइस प्रेसिडेंट ऑपरेशन सुधीर सुत्रावे, पुंडलिक गालफडे, लेजर इंडिया जर्मनी शिफ्ट वॉल कंपनीच्या एच आर मॅनेजर शिल्पा मुराडी, मॅट्रिक्स लाइफ सायन्स कंपनीचे एचआर सीनियर एक्झिक्यूटिव्ह जगदीश नंदकुले, एच आर एक्झिक्युटिव्ह अझरुद्दीन पठाण, इनर व्हील क्लब, माऊली बहुउद्देशीय संस्था, रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच पैठण तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका , मदतनीस, आशा कार्यकर्त्या व महिला बचत गट यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतदार जनजागृती या अनुषंगाने मार्गदर्शन केले.महिला मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महिलांनी गृहभेटी द्याव्यात त्याचप्रमाणे मतदार जनजागृती चळवळ उभारावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्विप नोडल अधिकारी श्रीराम केदार, सहाय्यक नोडल अधिकारी गहिरवार स्वीप सदस्य संतोष पवार ,किरण गाडेकर प्रमोद गंगावणे, गणेश घोरपडे ,अश्विन राजपूत यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक नीलम बाफना तर आभार प्रदर्शन सारंग चव्हाण यांनी व सूत्रसंचालन किरण गाडेकर यांनी केले.
०००००
0 Comments