नवी दिल्ली- आता तिरुपती मंदिरात गैर हिंदूंना काम करता येणार नाही. तिरुपती देवस्थानम (टीटीडी) बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष बीआर नायडू यांनी गुरुवारी सांगितले की व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुपतीमध्ये काम करणारे सर्व लोक हिंदू असले पाहिजेत. इतर धर्माच्या कामगारांबाबत काय निर्णय घ्यावा, त्यांना इतर सरकारी विभागात पाठवायचे की व्हीआरएस घ्यायला लावायचा याबाबत ते आंध्र प्रदेश सरकारशी बोलतील. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब म्हटली
टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू म्हणाले कि तिरुपती मंदिरात काम करणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू असावा, असा त्यांचा पहिला प्रयत्न असेल. यात अनेक मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले कि याकडे लक्ष द्यावे लागेल. नायडू म्हणाले की, टीटीडी बोर्डाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली हे त्यांचे भाग्य आहे. मागील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुमलामध्ये अनेक अनियमितता झाल्याचा आरोप बीआर नायडू यांनी केला. मंदिराचे पावित्र्य राखले पाहिजे, असे ते म्हणाले.
मंदिर विश्वस्त मंडळाने सोमवारी जाहीर केले की तिरुमला तिरुपती देवस्थानममध्ये काम करणाऱ्या सर्व गैर-हिंदूंच्या सेवा लवकरच समाप्त करतील आणि त्यांना आंध्र प्रदेश सरकारकडे सोपवतील असा निर्णय तिरुमला येथील अन्नमय भवन येथे अध्यक्ष बीआर नायडू यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ केल्याच्या वादानंतर टीटीडीची ही पहिलीच बैठक होती.
बैठकीनंतर, टीटीडी अध्यक्षांनी सांगितले की मंदिर प्रशासनात विविध पदांवर काम करणाऱ्या एकूण गैर-हिंदूंच्या संख्येचे मूल्यांकन केले जाईल आणि ते सरकारकडे सुपूर्द केले जातील. 2018 च्या अहवालानुसार, टीटीडीमध्ये इतर धर्माचे 44 कर्मचारी काम करतात. ते म्हणाले कि तिरुपती मंदिरात काम करणाऱ्या गैर-हिंदूंबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही राज्य सरकारला पत्र लिहू. टीटीडी ही हिंदू धार्मिक संस्था आहे आणि मंदिरात काम करण्यासाठी बिगर हिंदूंची नियुक्ती करू नये, असे मंडळाला वाटले. आम्ही त्यांना इतर विभागात सामावून घेण्यासाठी किंवा व्हीआरएस देण्यासाठी सरकारला पत्र लिहू, असेही नायडू म्हणाले.

0 Comments