खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

मोदी मतं चोरी करून प्रधानमंत्री बनले, राहुल गांधींचा गंभीर आरोप, निवडणूक आयोग संशयाच्या भोवर्यात

नवी दिल्ली/दै.मू.वृत्तसेवा
राहुल गांधींनी मतचोरीच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगाला चांगलंच घेरलंय. त्यावरुन आता निवडणूक आयोग संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेत राहूल गांधी यांनी गंभीर आरोप करताना म्हटले आहे कि नरेंद्र मोदी मतांची चोरी करून प्रधानमंत्री बनले आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला डेटा दिला तर आम्ही हे सिद्ध करू. यावरून निवडणूक आयोग संशयाच्या भोवर्यात सापडला आहे.

माहित असावे कि बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे निवडणूक आयोगावर गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र निवडणूक आयोगाने अद्यापही त्यांच्या प्रश्नांचे एकही उत्तर दिले नाही. वामन मेश्राम साहेब निवडणूक आयोगावर आरोप करताना म्हणतात ईव्हिएम मशीन चोर आहे आणि निवडणूक आयोग चोरांचा सरदार आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे कि त्यांचे म्हणणे खोटे असेल तर त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करावा, परंतू निवडणूक आयोग वामन मेश्राम साहेबांवर न्यायालयात खटला दाखल करू शकले नाहीत. कारण निवडणूक आयोगाला या घोटाळ्यात सामील असल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोग त्यांच्यावर खटला दाखल करण्याची हिंमत करत नाहीत.
निवडणूकीत मत चोरी होत असल्याची बाब कांग्रेस नेते राहूल गांधी यांना समजायला बराच वेळ लागला. याचे कारण त्यांनाच माहित असू शेकते. मात्र विशेष बाब अशी कि राहूल गांधी हे सातत्याने निवडणूक आयोगावर वोट चोरीचा आरोप लावत आहे. मात्र याविरोधात ते किंवा त्यांचा पक्ष रस्त्यांवर आंदोलन करताना दिसून येत नाही. याचा अर्थ काय समजावा? खरं तर कांग्रेसनेच भारतात ईव्हिएम आनलं. आणि आज तेच विरोध करत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे ते सत्तेत नाही. 

जेव्हा वामन मेश्राम साहेब 20 वर्षांपासून सांगत आहेत कि ईव्हिएममध्ये घोटाळा करून निवडणूका जिंकल्या जात आहेत, तेव्हा मात्र कांग्रेस पक्ष आणि राहूल गांधी यांनी मौन बाळगले. कारण कांग्रेस पक्षाला माहित होते कि त्यांनी देखिल ईव्हिएमध्ये घोटाळा करून निवडणूका जिंकल्या आहेत. मात्र आता लोकांचे लक्ष कांग्रेस पक्षाकडे विचलीत करण्यासाठी हा डाव खेळला जात आहे. जर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या घोटाळ्याचे राहूल गांधी यांच्याकडे पुरावे आहेत तर ते न्यायालयात धाव का घेत नाही. आता त्यांना जाग आली आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप करत बोगस मतदारांबाबत मोठा दावा केला. राहुल गांधी यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार यादी दाखवून एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर नोंदवलेले असल्याचा दावा केला. त्याबाबत केलेल्या पडतळाणीत एकच व्यक्ती चार ठिकाणी मतदार असल्याचे आढळून आले आहे. 

राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचे उदाहरण दिले. त्यांनी आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीच्या एपिक क्रमांकाचा उल्लेख करत ही व्यक्ती कर्नाटकसोबतच उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील मतदार असल्याचा दावा केला. लोकमतने राहुल गांधी यांच्या या दाव्याची पडताळणी केली असताना आदित्य श्रीवास्तव चार ठिकाणी मतदार असल्याचे दिसून आले आहे. 

बंगळुरू मध्य मतदारसंघातील मुनी रेड्डी गार्डनर परिसरातील एका 10-15 चौरस फूट घरात 80 मतदार कसे? असा प्रश्न देशभरात चर्चिला गेला. याबद्दल तेथील बूथ लेव्हल ऑफिसरने आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना सविस्तर खुलासा केला. बूथ लेव्हल ऑफिसर मुनीरत्न यांनी सांगितले की त्या घराच्या पत्त्यावर 80 मतदारांची नोंदणी आहे, ही बाब खरी आहे. पण स्थलांतरित कामगारांकडून मतदार नोंदणी करताना भाडे कराराचा वापर केला गेला आहे, जेणेकरून त्यांना मतदान ओळखपत्र मिळावेत.

 25 वर्षांपासून या घरामध्ये कोणीही कायम राहिलेला नाही. नोकरी, बँक खाते किंवा गॅस कनेक्शनसाठी रहिवाशी पत्ता आवश्यक असतो. त्यामुळे ते भाडेकरार करतात आणि मतदार ओळखपत्र बनवतात. नंतर घर सोडून जातात, पण मतदार यादीतील नाव तसेच राहेत.असे बीएलओ मुनीरत्न म्हणाले. या सर्व माहितीवरून निवडणूक आयोग संशयाच्या भोवर्या सापडला आहे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools