भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागापुरते मर्यादित आहेत काय
सरकारमार्फत संविधान गौरव सप्ताह साजरा करावा - भीम आर्मीची मागणी
मुंबई- २०-(प्रतिनिधी )-भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागापुरते मर्यादित आहेत काय असा सवाल करीत येणारा संविधान दिवस राज्य सरकारने संविधान गौरव सप्ताह म्हणून साजरा करावा सर्व शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये शाळा कॉलेजमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करावे अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेने केली आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले देशभरात हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो . महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागामार्फत २०१६ पासून सविधान समता सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
परंतु राज्य सरकारच्या प्रशासकीय स्तरावर सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन संविधान गौरव सप्ताह साजरा करावा ,राज्य सरकारने परिपत्रक काढावे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक रित्या भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात यावे शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश करावा , आठवडाभर संविधानावर आधारित कार्यक्रमांची आखणी करावी संविधान जागृती करणाऱ्या मान्यवरांचा संविधान सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात यावा आदी मागण्या या संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोकभाऊ कांबळे यांनी केल्या आहेत .
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर हा संविधान गौरव सप्ताह म्हणून घोषित करावा म्हणून महाराष्ट्रभरातुन मुख्यमंत्र्यांना ईमेल तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आहे मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने हा विषय सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केल्याचे कळविल्यानंतर संबंधितांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
भीम आर्मी सह विविध स्तरावरील मान्यवरांनी भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागापुरते मर्यादित आहेत काय असा सवाल केला असून राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संविधान सन्मान सप्ताह साजरा करावा अशी मागणी केली आहे
- पँथर
0 Comments