पालघर - मोखाडा तालुक्यातील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री ललित मोरे व श्री गोपाळ कव्हा स्वाभिमान आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित
मोखाडा सारख्या आदिवासी व अतिदुर्गम भागात जि प शाळा पवारपाडा ता मोखाडा जि पालघर येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सेवा बजावत असलेले तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री ललित अनंतराव मोरे व श्री गोपाळ जीवा कव्हा जि प शाळा भोईरपाडा यांच्या उत्तम कार्याची श्री हेमंत लहामगे राज्य कोषाध्यक्ष स्वाभिमान शिक्षक संघटना यांनी दखल घेत, महाराष्ट्र राज्य स्वाभिमान शिक्षक संघटनेकडून दिला जाणारा राज्यस्तरीय स्वाभिमान आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने रविवार दिनांक १७/०८/२०२१ रोजी आदर्श महाविद्यालय कुळगाव, बदलापूर जि ठाणे येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा आमदार श्री किसनजी कथोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मोखाडा तालुक्यात एक तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व सर्वांगीण विकासासाठी ते सतत नाविण्यपूर्ण उपक्रम आपल्या शाळेत राबवत असतात. तसेच तालुक्यात त्यांचे हे उपक्रम इतर शिक्षक व विद्यार्थ्यांना देखिल मार्गदर्शक ठरत असतात.
या आधीही त्यांना पंचायत समिती मोखाडा, शिक्षण विभागाकडून उपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
श्री ललित मोरे यांनी आपल्या सेवेतील १४ वर्ष त्यांनी जि प शाळा वखारीचापाडा येथे कार्य करीत असताना शाळेत विविध उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा उंचावला आहे.
विविध क्रीडा प्रकारात त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीपर्यंत नेले आहे व विविध पारितोषिके मिळवुन दिली आहेत.
विविध स्पर्धा परीक्षांमध्येदेखिल त्यांच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी बजावली आहे या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे..
0 Comments