आजरा : गोव्यात कांदा विक्री करून आयशर टेम्पोतून १२ लाख ८९ हजार ५२८ रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू आणणाऱ्या बीडच्या दोघांना आजरा पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे.
खय्युम पठान अब्बास खान व रामदेवराव नलवडे यांनी चालकाच्या केबिनच्या मागे दारू ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पा केला आहे.
त्यामधून दारूची वाहतूक केली जात होती , रात्री गवसे चेक पोस्टला पोलीसांना शंका आली म्हणून टेम्पोची तपासणी केली.
त्यामध्ये पोलिसांनी मॅकडॉल व्हिस्कीचे ३ लाख ५९ हजार ४२४ रुपयांचे ११७ बॉक्स, इंपिरियल ब्लू ग्रीन व्हीस्कीचे १ लाख ७५ हजार १०४ रुपये किमतीचे ५७ बॉक्स, चॉकलेटी रंगाचा ७ लाख ७५ हजार किंमतीचा आयशर टेम्पो, ओपो कंपनीचा ५ हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण १२ लाख ८९ हजार ५२८ रुपयांचा माल जप्त केला आहे..
गडहिंग्लज प्रतिनिधी : रविंद्र कांबळे
0 Comments