उस्मानाबाद - परंडा पचायत समीतीचे माजी सभापती काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सदाशिवराव उर्फ बाबासाहेब पाटील चिंचपुरकर ( वय ८७ वर्ष ) यांचे रविवार ( दि .२३ ) रात्री ८:३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
ते जिल्हा परिषदचे माजी सभापती रणजितसिंह पाटील यांचे वडील होत वाघ पाळणारे चिंचपूरकर पाटील अशी त्यांची ख्याती होती.
तात्कालीन राजकीय परिस्थितीत त्यांचा मोठा दबदबा तर समाजकारण, शैक्षणीक व कृषी क्षेत्रात त्यांनी आपली एक ओळख निर्माण चांगला ठसा उमटविला आहे त्यांच्या जाण्याने परंडा तालुका परिसरामध्ये शोककळा पसरली आहे..
यावेळी त्यांना परंडा येथे ज्ञानेश्वर तात्या पाटील मित्रमंडळ व तमाम शिवसैनिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली
याप्रसंगी रमेशजी परदेशी यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी शिवसेना युवा नेते रणजित दादा पाटील, मा.उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी, शिवसेना नगरसेवक मकरंद जोशी, डॉ.अब्बास मुजावर, राहुल देवळे, प्रितम डाके, विकास साळुंखे, रफिक मुजावर, तौफिक मुजावर, तुकाराम गायकवाड, दत्ता मेहेर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते..
परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे
0 Comments