अहमदनगर : जिल्हा आशा गट प्रवर्तक संघटना अहमदनगर
तसेच महाराष्ट राज्य आशा गट प्रवर्तक कृती समीती यांनी पुकारलेल्या आशा गट प्रवर्तक बेमुदत संपाचे आज राहत्यात पंचायत समीती येथे पडसाद उमटले.
प्रचंड संखेने आशा चितळी चौकातून शांततेच्या मार्गाने पंचायत समीती रहाता येथे जमल्या.
राहत्याचे तहसलीदार मा कुंदन हिरे यांनी निवेदन स्वीकारले.
डॉ गायकवाड या वेळी उपस्थित होते, सदर धरने आंदोलनाचे नेतृत्व अहमदनगर जिल्हा आशा गट प्रवर्तक संघटनेचे जिल्हा संघटक कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी केले.
अखील भारतीय किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष मा . कॉ . प्रा एल एम डांगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर आंदोलनास आपला पाठींबा असल्याचे जाहीर करून मनोगत व्येक्त केले.
सदर प्रसंगी सौ अश्विनी गोसावी सोनाली शेजुळ सविता धापटकर शैला कांबळे जयश्री गुरव यांनी मनोगत व्येत्क केले व दुपारी दोन वाजता निवेदन देऊन धरना कार्यक्रम संपला दिनांक सोळा जून पासून बेमुदत संप सुरु होणार..
0 Comments